महेंद्रसिंह धोनीने रचला इतिहास, जागतिक क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणालाही ‘हे’ करता आलेलं नाही!

WhatsApp Group

IPL 2024 MS Dhoni | भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने रविवारी (31 मार्च) क्रिकेटच्या इतिहासात एक असा विक्रम रचला, ज्याला आतापर्यंत जगातील कोणताही यष्टीरक्षक स्पर्श करू शकला नाही. धोनीने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या मोसमात हा ऐतिहासिक विक्रम केला आहे. रविवारी विशाखापट्टणमच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात फिरकी अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या चेंडूवर धोनीने पृथ्वी शॉला विकेटच्या मागे झेलबाद केले.

अशाप्रकारे टी-20 क्रिकेटमध्ये यष्टीपाठी 300 विकेट घेणारा धोनी जगातील पहिला यष्टीरक्षक बनला आहे. या यादीत पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक कामरान अकमल आणि भारताचा दिनेश कार्तिक संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे, ज्यांनी बरोबरीने 274 बळी घेतले आहेत.

हेही वाचा – रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! जनरल तिकीट काढणाऱ्यांना आजपासून मिळणार ही सुविधा

कार्तिक अजूनही आयपीएल खेळत आहे. तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (RCB) खेळत आहे. अशा स्थितीत कामरानला पराभूत करण्याची संधी त्याच्याकडे आहे. त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक (270) आणि इंग्लंडचा जोस बटलर (209) तिसऱ्या स्थानावर आहे. तो सध्या क्रिकेटही खेळतोय.

टी-20 क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक विकेट

300 – महेंद्रसिंह धोनी*
274 – कामरान अकमल
274 – दिनेश कार्तिक
270 – क्विंटन डीकॉक
209 – जोस बटलर

धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 332 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले (कसोटी + वनडे + टी20). जे कर्णधार म्हणून सर्वोच्च आहे. रिकी पाँटिंगने 324 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. या 332 सामन्यांपैकी धोनीने 178 सामने जिंकले आणि 120 सामने गमावले. 6 सामने बरोबरीत तर 15 अनिर्णित राहिले. माहीने 90 कसोटींमध्ये 4876 धावा, 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10773 धावा आणि 98 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1617 धावा केल्या आहेत. त्याने 250 IPL सामन्यात 5082 धावा केल्या आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment