IPL 2024 PBKS vs SRH : आशुतोष, शशांकची झुंज अपयशी, रोमांचक सामन्यात हैदराबादची पंजाबवर 2 धावांनी मात

WhatsApp Group

IPL 2024 PBKS vs SRH : आयपीएल 2024 हंगामात, सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. यामध्ये नितीश कुमार रेड्डी यांच्या शानदार खेळीच्या जोरावर सनरायझर्स संघाने शानदार विजयाची नोंद केली. नितीशने गोलंदाजीतही एक विकेट घेतली. हा सामना मल्लनपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबाद संघाने 183 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात पंजाबला 6 बाद 180 धावांपर्यंत पोहोचता आले. आशुतोष शर्माने नाबाद 33 आणि शशांक सिंगने नाबाद 46 धावांची झुंज दिली, पण ते अपयशी ठरले. भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी या सामन्यात हैदराबाद संघाची सुरुवात खूपच खराब झाली. त्यांनी केवळ 39 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. यानंतर नितीश कुमार रेड्डीने 32 चेंडूत अर्धशतक करत संघाची धुरा सांभाळली. त्याने 37 चेंडूत 64 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. नितीशने 4 चौकार आणि 5 षटकार ठोकले. तर अब्दुल समदने 12 चेंडूत 25 धावा केल्या.

हेही वाचा – महाराष्ट्रात एनडीएला मनसेचा पाठिंबा, राज ठाकरेंची ‘मोठी’ घोषणा!

दोन्ही संघांची Playing 11

पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, सॅम करन, सिकंदर रझा, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग आणि कगिसो रबाडा.
इम्पॅक्ट सब : प्रभसिमरन सिंग, नॅथन एलिस, तनय थियागराजन, राहुल चहर, ऋषी धवन.

सनरायझर्स हैदराबाद : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, शाहबाज अहमद, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), नितीश रेड्डी, अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि जयदेव उनाडकट.

इम्पॅक्ट सब : उमरान मलिक, मयंक मार्कंडे, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, राहुल त्रिपाठी.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment