IPL 2024 RR vs GT : गुजरातचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची Playing 11

WhatsApp Group

IPL 2024 RR vs GT : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये राजस्थान रॉयल्स (RR) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात सामना खेळला जात आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना होत आहे, ज्यामध्ये गुजरात संघाचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून पावसामुळे प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघाने या मोसमात आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. सर्व 4 सामने जिंकून ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने आतापर्यंत 5 पैकी केवळ 2 सामने जिंकले आहेत.

राजस्थानने या मोसमात आतापर्यंत चांगली कामगिरी केली असली, तरी आयपीएलमध्ये गुजरातविरुद्धचा त्याचा एकूण रेकॉर्ड खूपच खराब राहिला आहे. गुजरातचा संघ 2022 च्या हंगामातच दाखल झाला आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 5 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये गुजरातने 5 तर राजस्थानने केवळ 1 सामना जिंकला आहे.

हेही वाचा – भारताचे अंतराळवीर चंद्रावर उतरणार, चांद्रयान-4 मोहिमेवर ISRO ची मोठी माहिती!

दोन्ही संघांची Playing 11

राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कप्तान), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.

गुजरात टायटन्स – शुबमन गिल (कप्तान), साई सुदर्शन, विजय शंकर, अभिनव मनोहर, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), राहुल तेवतिया, राशिद खान, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद, मोहित शर्मा.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment