IPL 2024 : मुरली कार्तिकच्या वक्तव्यामुळे खळबळ, यश दयालला म्हणाला, “काही लोकांचा कचरा…”

WhatsApp Group

IPL 2024 Murali Kartik On Yash Dayal | आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबीचे विजयी खाते उघडले. 25 मार्च रोजी झालेल्या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जवर चार गडी राखून विजय मिळवला. जिथे विराट कोहली आणि दिनेश कार्तिकने फलंदाजीत संघासाठी आश्चर्यकारक कामगिरी केली. तर यश दयालने किफायतशीर गोलंदाजी करत पंजाबला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. त्याच्या शानदार गोलंदाजीचे कौतुक करताना माजी क्रिकेटपटू आणि समालोचक मुरली कार्तिकने वादग्रस्त विधान केले आहे.

खरं तर, आरसीबीचा वेगवान गोलंदाज यश दयालने चार षटकांच्या कोट्यात केवळ 23 धावा दिल्या. एक विकेटही त्याच्या नावावर राहिली. सामन्यादरम्यान इंग्लिश कॉमेंट्री पॅनलचा भाग असलेला मुरली कार्तिक म्हणाला, “काही लोकांचा कचरा, हा कुणाचा तरी खजिना असतो.”

यश दयाल गेल्या मोसमात गुजरात टायटन्स संघाचा भाग होता. गेल्या मोसमात, एका सामन्यादरम्यान, रिंकू सिंहने त्याच्या ओव्हरच्या शेवटच्या पाच चेंडूंवर पाच षटकार मारून कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवून दिला होता. यानंतर यश दयाल संघात आणि बाहेर जात राहिला. IPL 2024 पूर्वी झालेल्या मिनी लिलावात गुजरातने त्याला सोडले होते. कार्तिकच्या वक्तव्याचा याच्याशी संबंध जोडला जात आहे. त्याच्या या वक्तव्यावर चाहते नाराजी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा – IPL 2024 : धक्कादायक! सुरक्षारक्षकांना चकवून फॅनची विराट कोहलीकडे धाव, मग पुढे…., पाहा Video

आयपीएल 2024 च्या लिलावात आरसीबीने यश दयालला 5 कोटी रुपयांना जोडले होते. आता या मोसमात त्याची कामगिरी कशी होते हे पाहावे लागेल.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment