

Keshav Maharaj visited Ram Mandir | दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज अयोध्येतील राम मंदिरात पोहोचला. महाराजांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरही त्याचे फोटो पोस्ट केले आहे. यासोबतच महाराजने कॅप्शनमध्ये जय श्री राम लिहिले आहे. केशव महाराज आयपीएल 2024 मध्ये लखनऊ सुपरजायंट्सचा भाग आहेत. एलएसजीमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी अयोध्येला पोहोचून प्रभू रामाचे दर्शन घेतले.
यावेळी केशव महाराजसोबत एलएसजीचे प्रशिक्षक जस्टिन लँगर, जॉन्टी रोड्स आणि रवी बिश्नोई हे देखील होते. हे सर्व फोटो एलएसजीच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आले आहेत. केशव महाराज हा राम भक्त आहेत. महाराज क्रिकेटच्या मैदानात उतरला, की सहसा स्टेडियममध्ये ‘राम सिया राम’चा सूर वाजू लागतो.
केशव महाराजने अयोध्येतील राम मंदिरातील अभिषेक सोहळ्याचे कौतुक केले होते. त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला होता आणि आशा व्यक्त केली होती की यामुळे संपूर्ण मानवतेमध्ये शांतता आणि सौहार्द नांदेल. एवढेच नाही तर अभिषेक सोहळ्याचा व्हिडिओही त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे केशव महाराजचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशचे आहे. नुकतेच एका मुलाखतीत त्याने भगवान रामावरील त्याच्या भक्तीबद्दल सांगितले.
हेही वाचा – Vande Bharat Sleeper : वंदे भारत ‘स्लीपर’ असणार विमानासारखी, 5 स्टार हॉटेल सारख्या सोयी!
भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला असताना एक रंजक घटना घडली. केशव महाराज बॉलिंग किंवा बॅटिंग करायला आला, की मैदानात राम सिया रामचा सूर वाजू लागला. पर्लमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान केशव महाराज आणि केएल राहुल यांच्यात यासंदर्भात चर्चाही झाली होती. त्याचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. लखनऊ सुपरजायंट्स 24 मार्च रोजी इंडियन प्रीमियर लीगमध्ये पहिला सामना खेळणार आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!