GOOD NEWS : जसप्रीत बुमराह झाला बाबा, मस्त ठेवलंय मुलाचे नाव!

WhatsApp Group

Jasprit Bumrah : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बाप झाला आहे. आशिया चषक अर्ध्यावर सोडून तो या रविवारीच मुंबईला परतला. बुमराहने स्वतः सोशल मीडियावर आपल्या मुलाबद्दल माहिती दिली. बुमराहने म्हटले, ”आमचे छोटे कुटुंब मोठे झाले आहे. माझे आणि कुटुंबाचे हृदय आनंदाने भरले आहे. आज सकाळी आम्ही आमचा धाकटा मुलगा अंगद जसप्रीत बुमराहचे जगात स्वागत केले. आम्ही खूप आनंदी आहोत आणि आमच्या आयुष्यातील हा एक नवीन अध्याय आहे.” पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह बराच काळ टीम इंडियातून बाहेर असल्याची माहिती आहे. त्याच्यावर शस्त्रक्रियाही करावी लागली. अलीकडेच त्याने आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून पुनरागमन केले.

जसप्रीत बुमराहने 2021 मध्ये मॉडेल आणि प्रेझेंटर संजना गणेशनशी लग्न केले. एका कार्यक्रमाचे अँकरिंग करताना बुमराह आणि संजना यांची भेट झाली. यानंतर मैत्री सुरू झाली आणि नंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हे लग्न कोरोनाच्या काळात झाले. या कारणास्तव त्यात फार कमी लोकांना बोलावण्यात आले. विश्वचषकापूर्वी बुमराहचे पुनरागमन टीम इंडियासाठी महत्त्वाचे मानले जात असल्याची माहिती आहे. 2011 पासून भारतीय संघाला विश्वचषक विजेतेपद मिळवता आलेले नाही.

हेही वाचा – IND vs PAK : “हटव तो कॅमेरा…”, रोहित शर्माला आला राग! काय घडलं? तुम्हीच पाहा VIDEO

संजना गणेशन फक्त क्रिकेटच्या मैदानावरच नव्हे, तर बॅडमिंटन आणि फुटबॉलसारख्या खेळांमध्ये अँकरिंगही केले आहे. संजनाने अभिनयातही हात आजमावला आहे आणि ती फेमिना ऑफिशियल गॉर्जियस देखील होती. तिने आयसीसीचे अनेक कार्यक्रमही होस्ट केले आहेत. लवकरच बुमराह सुपर-4 साठी श्रीलंकेत परत येऊ शकतो. आशिया चषक स्पर्धेत आज भारतीय संघाचा सामना नेपाळशी होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ सुपर-4 साठी पात्र ठरेल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment