

IPL 2025 Final : आयपीएल २०२५ फायनलला अगदी काही वेळ शिल्लक आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज या मेगा मॅचकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेला प्रथमच नवा विजेता मिळणार आहे. आरसीबीचा संघ ट्रॉफी उचलून विराट कोहलीलाल मानवंदना देईल की ग्रेट कप्तान श्रेयस अय्यर पहिल्यांदाच पंजाब संघाला विजेता करेल, हे रात्रीच स्प्ष्ट होईल. पण तत्पूर्वी एका गोष्टीमुळे सर्वांच्या मनात उत्सुकता वाढली आहे.
या मेगा फायनलपूर्वी आयसीसीचे चेअरमन जय शाह यांनी आरसीबीच्या टीम हॉटेलमध्ये पोहोचले आहे. जय शाह यांचे ‘विराटप्रेम’ जगजाहीर आहे. त्यामुळे ते नक्की कोणत्या कारणासाठी तिथे गेले आहेत, याचा अंदाज चाहतेच बांधत आहेत. त्यांचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
JAY SHAH AT RCB TEAM HOTEL. 🤯pic.twitter.com/2Re2QaPcpD
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 3, 2025
हेही वाचा – IPL 2025 Final : पावसामुळे मॅच कॅन्सल, ‘हा’ संघ उचलणार ट्रॉफी!
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात आतापर्यंत एकूण ३६ आयपीएल सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी आरसीबीने १८ आणि पंजाब किंग्जने १८ सामने जिंकले आहेत. पंजाब किंग्जविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कमाल धावसंख्या २४१ आणि किमान धावसंख्या ८४ धावा आहे. त्याच वेळी, आरसीबीविरुद्ध पंजाब किंग्जचा कमाल धावसंख्या २३२ धावा आहे, तर किमान धावसंख्या ८८ धावा आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!