

Jos Buttler : चॅम्पियन्स ट्रॉफीमधील निराशाजनक कामगिरीनंतर इंग्लंडचा मर्यादित षटकांचा कर्णधार जोस बटलरने पद सोडले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडची कामगिरी खूपच खराब होती आणि संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला होता. इंग्लंडने त्यांचे सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आणि त्यांच्या मोहिमेचा शेवट गट टप्प्यातच झाला. आता शनिवारी इंग्लंडचा गटातील शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध आयसीसी एकदिवसीय स्पर्धेत सर्वाधिक लक्ष्य गाठले. यानंतर, अफगाणिस्तानने इंग्लंडला पराभूत करून उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर काढले. अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामना ‘करो या मरो’ असा होता.
BREAKING: Jos Buttler has stood down as England white-ball captain, following his side's Champions Trophy exit 🚨 pic.twitter.com/BQ5yiy4yTa
— Sky Sports Cricket (@SkyCricket) February 28, 2025
हेही वाचा – तुहिन कांता पांडे SEBI चे नवीन अध्यक्ष..! सहसचिव ते अर्थ मंत्रालयापर्यंत काम
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर बटलरने सांगितले होते की तो त्याच्या भविष्याबद्दल संघ व्यवस्थापन आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) सोबत चर्चा करेल. बटलर म्हणाला की तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून खेळत राहील. कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त झाल्यानंतर तो अधिक चांगली कामगिरी करू शकेल अशी आशा त्याने व्यक्त केली.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!