नीरज चोप्राची बायको, त्याच्याप्रमाणेच एक खेळाडू, भारतासाठी जिंकलंय सुवर्णपदक

WhatsApp Group

Neeraj Chopra Wife Himani Mor : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने रविवारी त्याच्या लग्नाची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. नीरजने लग्न समारंभाचे काही फोटो सोशल मीडियावरून शेअर केले. त्याने हिमानी मोरशी लग्न केले, त्यानंतर प्रश्न निर्माण झाले की हिमानी मोर कोण आहे?

नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरनेही भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. हिमानी एक टेनिस खेळाडू आहे. हरयाणातील सोनीपत येथील रहिवासी असलेली हिमानी सध्या फ्रँकलिन पियर्स विद्यापीठातून क्रीडा व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी घेत आहे.

हिमानी मोरला एक भाऊ आहे आणि तो टेनिस देखील खेळतो. हिमानीने दिल्ली विद्यापीठाकडून राष्ट्रीय पातळीवर टेनिस खेळली आहे. यानंतर, त्याने तैपेई येथे झालेल्या 2017 च्या जागतिक विद्यापीठ खेळांमध्ये भाग घेतला. याआधी हिमानीने सुवर्णपदक जिंकले होते.

हिमानीच्या शाळेच्या वेबसाइटनुसार, तिने मलेशियामध्ये झालेल्या वर्ल्ड ज्युनियर टेनिस चॅम्पियनशिप 2016 मध्ये सुवर्णपदक जिंकले. तिने सोनीपतच्या लिटिल एंजल्स स्कूलमधून शिक्षण घेतले आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!  

Leave a comment