IPL 2023 CSK vs MI Rohit Sharma MS Dhoni : आयपीएल 2023 चा 49 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन चॅम्पियन संघांमध्ये होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. गेल्या वेळी वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि CSK चे संघ भिडले होते जिथे CSK ने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली 7 गडी राखून सामना जिंकला होता. अशा परिस्थितीत आता सीएसकेच्या घरी जाऊन त्याचा बदला पूर्ण करण्याची वेळ मुंबईकरांवर आली आहे.
या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत मुंबई इंडियन्सचा कप्तान रोहित शर्मा आणि चेन्नई सुपर किंग्जचा कप्तान महेंद्रसिंह धोनी नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. व्हिडिओ बनवणाऱ्याने या दोघांना एकाच फ्रेममध्ये टिपले असून रोहित आणि धोनी मोठे फटके खेळताना दिसतात. ”कॅप्शन सो़डा. व्हिडिओ पाहा”, असे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा – MG Comet EV : सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारच्या व्हेरिएंटची घोषणा..! जाणून घ्या किंमत
Caption jaane do. Video dekho. 👀#OneFamily #CSKvMI #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #TATAIPL #IPL2023 @ImRo45 @msdhoni pic.twitter.com/TH4Lo8SZln
— Mumbai Indians (@mipaltan) May 5, 2023
दोन्ही संघ आयपीएलचे चॅम्पियन आहेत. मुंबईने चार वेळा या लीगचे विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर CSK चा संघ चार वेळा चॅम्पियन बनला आहे. अशा स्थितीत दोन्ही संघ मैदानात उतरतील तेव्हा चुरशीची चुरस पाहायला मिळणार आहे. मात्र, त्याआधी चेपॉकची खेळपट्टी कशी आहे आणि तेथील हवामान काय आहे ते जाणून घेऊया.
पीच रिपोर्ट
चेपॉक येथील मैदान फिरकी गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरले आहे. अशा परिस्थितीत येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला नेहमीच फायदा झाला आहे. फलंदाजीत धावा सहज होतात. अशा परिस्थितीत गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये रोमांचक स्पर्धा पाहायला मिळते.
या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करताना सरासरी 163 धावा झाल्या आहेत. त्यामुळेच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने या मैदानावर सर्वाधिक विजय मिळवले आहेत. अशा परिस्थितीत या मैदानावर जो संघ नाणेफेक जिंकेल. तो प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेईल, अशी शक्यता आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!