

MS Dhoni’s Bike And Car Collection : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी मूळचा रांचीचा आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद आणि सुनील जोशी धोनीच्या घरी पोहोचले. यादरम्यान धोनीने दोघांना आपल्या बाईकचे कलेक्शन दाखवले. हे कलेक्शन पाहून व्यंकटेश प्रसाद आणि सुनील जोशी थक्क झाले. धोनीची पत्नी साक्षीने याप्रसंगाचा संपूर्ण व्हिडिओ शूट केला आहे.
धोनीच्या रांची फार्महाऊसवर बाईक कलेक्शनचे असे दृश्य तुम्ही कधीही पाहिले नसेल. या व्हिडीओमध्ये साक्षीने धोनीला याची काय गरज होती, असा प्रश्नही विचारला आहे, ज्यावर त्यानेही मस्त उत्तर दिले आहे.
जेव्हा साक्षीने माहीला याची काय गरज आहे असे विचारले तेव्हा धोनीने उत्तर दिले, ”तू सर्व काही घेतले होते, मला माझ्यासाठी काहीतरी हवे होते, ही एकमेव गोष्ट होती ज्यासाठी तू मला परवानगी दिलीस.”
The bike collection of MS Dhoni.
This is massive. pic.twitter.com/RVuygqNHAo
— Johns. (@CricCrazyJohns) July 17, 2023
हेही वाचा – 2024 ची निवडणूक : विरोधकांच्या आघाडीचं नवं नाव..’INDIA’! ‘असा’ आहे फुलफॉर्म
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि आता तो फक्त इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये खेळताना दिसतो. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 मध्येही विजेतेपद पटकावले होते. धोनीने अंतिम सामन्यानंतर सांगितले होते की, मला पुढील वर्षीही खेळायला आवडेल, जे त्याच्या चाहत्यांसाठी त्याच्याकडून परतीच्या भेटीसारखे असेल.
धोनीच्या बाईक कलेक्शनचा व्हिडीओ शेअर करताना व्यंकटेश प्रसाद यांनी लिहिले की, ”माणसांमध्ये मी पाहिलेली ही सर्वात वेडी आवड आहे. काय कलेक्शन आणि काय माणूस आहे धोनी! काय ग्रेट अचिव्हर आणि त्या पेक्षा काय जबरदस्त माणूस आहे धोनी! रांची येथील त्यांच्या घरी त्यांच्या बाईक आणि कार संग्रहाची एक झलक. त्याला आणि त्याची पॅशन पाहून मी पूर्णपणे आश्चर्यचकित झालो.”
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!