IPL 2024 : आली रे आली…मुंबई इंडियन्सची नवीन जर्सी आली!

WhatsApp Group

Mumbai Indians New Jersey | इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) 22 मार्चपासून सुरू होत आहे. या मोसमात मुंबई इंडियन्स नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. हार्दिकसाठी मुंबईने गुजरात टायटन्सकडे ट्रेड केले. मुंबईने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. आता मुंबईने या हंगामासाठी नवीन जर्सी सर्वांसमोर आणली आहे. त्याचा एक व्हिडिओही मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केला.

मुंबई 24 मार्चपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करेल, जिथे त्यांचा सामना 2022 च्या विजेत्या गुजरात टायटन्सशी होईल. मुंबईला 10 वर्षांनंतर नवा कर्णधार मिळाला आहे. हार्दिक पांड्या त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईसाठी काय चमत्कार करू शकतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. पांड्याने त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला आयपीएल 2022 मध्ये चॅम्पियन बनवले असले तरी त्याचा प्रवास मुंबईसाठी कसा असेल हे येणारा काळच सांगेल.

हेही वाचा – सोलापुरात भाजपकडून गुणरत्न सदावर्ते यांना उमेदवारी?

मुंबई इंडियन्सचा पूर्ण संघ

रोहित शर्मा, देवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमारियो शेफर्ड, हार्दिक पांड्या (कप्तान), जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment