

IPL 2023 Mumbai Indians : आयपीएल 2023 च्या चालू हंगामात विक्रमी 5 वेळा चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्सचा प्रवास संपुष्टात आला. अहमदाबाद येथे शुक्रवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सकडून त्याचा पराभव झाला. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममधील एक भावनिक व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओत मुंबई इंडियन्सचे ड्रेसिंग रुम आणि खेळाडू दाखवले आहेत. खेळाडू यंदासाठी इतर खेळाडूंचा निरोप घेताना दिसत आहे. सूर्या पोलार्ड यांची गळाभेट, जॉर्डन-इशानची खेलभावना या व्हिडिओत दिसून आली. मुंबईने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ”जातो नाही. येतो म्हण”, म्हटले आहे.
गुजरातकडून 62 धावांनी पराभव
अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने IP 2023 एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सवर 62 धावांनी विजय नोंदवला. शुबमन गिलच्या (129) शानदार शतकामुळे गुजरातने 3 बाद 233 धावांची मोठी धावसंख्या उभारली. यानंतर मुंबईचा संघ 18.2 षटकांत 171 धावांत सर्वबाद झाला. सूर्यकुमार यादवने 38 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार लगावत मुंबईसाठी 61 धावांची भर घातली. गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माने केवळ 2.2 षटकात 5 बळी घेतले.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!