एक कॅच, गेली मॅच…! थरारक सामन्यात नेदरलँड्सचा पाकिस्तानविरुद्ध पराभव

WhatsApp Group

T20 World Cup 2026 : सामन्याच्या रोमांचक वळणावर नेदरलँड्सचा खेळाडू मॅक्स ओ’डॉडने पाकिस्तानचा डावखुरा फलंदाज फहीम अश्रमचा झेल सोडल्यानंतर नेदरलँड्सला पाकिस्तानविरुद्ध निसटता पराभव स्वीकारावा लागला. आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या सलामी सामन्यात नेदरलँड्सने दमदार खेळ करत पाकिस्तानसमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. त्यांनी प्रथम फलंदाजी करत 19.5 षटकांत सर्वबाद 147 धावा केल्या.

डावाची सुरुवात नेदरलँड्सने आत्मविश्वासाने केली. सहाव्या षटकात तीन चौकारांच्या मदतीने 14 धावा काढत संघाने पॉवरप्लेअखेर 50 धावा, 2 गडी बाद अशी मजल मारली. मधल्या षटकांमध्ये कर्णधार स्कॉट एडवर्ड्स आणि बास दे लीडे यांनी डाव सावरला.

स्कॉट एडवर्ड्सने 29 चेंडूंमध्ये 37 धावा करत नेतृत्वाची जबाबदारी उचलली, तर दे लीडेने 25 चेंडूंमध्ये 30 धावांची उपयुक्त खेळी केली. चौथ्या विकेटसाठी झालेल्या 40 धावांच्या भागीदारीमुळे नेदरलँड्स किमान 150 धावांचा टप्पा गाठेल, अशी आशा निर्माण झाली होती. अर्ध्या डावानंतर नेदरलँड्सची स्थिती 79 धावा, 3 गडी बाद अशी मजबूत होती. संघाने आतापर्यंत 12 चौकार आणि एक षटकार लगावला होता. 12.1 षटकांत संघाने 100 धावांचा टप्पा ओलांडत सामना आपल्या बाजूने झुकवला. मात्र त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत सामन्याचे चित्र बदलले. 12.3 षटकांत 105/3 अशी असलेली नेदरलँड्सची अवस्था काही क्षणांतच 16.4 षटकांत 129/7 अशी झाली. अखेरीस संपूर्ण संघ 147 धावांत माघारी परतला.

पाकिस्तानकडून सलमान मिर्झा याने उत्कृष्ट गोलंदाजी करत 3 गडी 24 धावांत बाद केले. त्याला साईम अयूब (2/7), मोहम्मद नवाझ (2/38) आणि अबरार अहमद (2/23) यांची चांगली साथ मिळाली.

लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात मात्र अपेक्षेप्रमाणे झाली नाही. संघाचा कणा मानला जाणारा बाबर आझम स्वस्तात बाद झाल्याने पाकिस्तानवर मोठे दडपण आले. पाकिस्तानकडून साहिबझाना फरहानने सर्वाधिक 47 धावा केल्या. त्यांनी 114 धावांत 7  विकेट्स गमावल्या. शेवटच्या दोन षटकात पाकिस्तानला विजयासाठी 29 धावांची गरज होती. 19व्या षटकात जमॅक्स ओ’डॉडने फहीम अश्रफचा झेल सोडला. त्यानंतर अश्रफने त्या षटकात 3 षटकार आणि एक चौकार लगावत विजय साकार केला. त्याने 9 चेंडूत 25 धावा केल्या.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment