‘सुपरस्टार’ ऋषभ पंतचे दुसऱ्या डावातही शतक, रचला ‘नवा’ इतिहास!

WhatsApp Group

Rishabh Pant : भारताचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतची बॅट इंग्लंडमध्ये चांगलीच गाजत आहे. पंतने लीड्समध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावातही शतक झळकावले आहे. सोमवारी त्याने १३० चेंडूत १०० धावा पूर्ण केल्या. यादरम्यान त्याने १३ चौकार आणि दोन षटकार मारले. २७ वर्षीय पंतने एक उत्तम विक्रम रचला आहे. इंग्लंडमध्ये कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा तो एकमेव भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात त्याने १७८ चेंडूत १२ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने १३४ धावा केल्या.

इंग्लंडविरुद्ध दोन्ही डावात शतके करणारा ऋषभ पंत पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके करणारा  पंत दुसरा यष्टीरक्षक ठरला. भारतीय संघाने १९३२ मध्ये पहिला अधिकृत कसोटी सामना खेळला. भारतीय कसोटी क्रिकेटच्या ९३ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही विकेटकीपर फलंदाजाला कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावता आलेले नाही.

हेही वाचा – पृथ्वी शॉचा करिअर वाचवण्यासाठी ‘मोठा’ निर्णय, मुंबई क्रिकेट असोसिएशनला ई-मेल, म्हणाला…

एकाच कसोटी सामन्याच्या दोन डावात शतक झळकावणारा ऋषभ पंत हा सातवा भारतीय फलंदाज आहे. सुनील गावसकर यांनी हे तीन वेळा, राहुल द्रविड यांनी दोनदा, विजय हजारे, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांनीही प्रत्येकी एकदा केले आहे. आता या दिग्गजांच्या यादीत ऋषभ पंतचे नावही जोडले गेले आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment