IND Women World Cup Victory: रोहित शर्माच्या डोळ्यांत आनंदाश्रू! भारतीय महिलांनी पहिल्यांदाच वर्ल्डकप जिंकत रचला इतिहास; संपूर्ण देशात जल्लोष

WhatsApp Group

Rohit Sharma On Team India Women Won World Cup  : भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकप जिंकत इतिहास घडवला आणि या अविस्मरणीय क्षणाने संपूर्ण देश जल्लोषात न्हाऊन निघाला. नवी मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारताने 52 वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम दिला. या ऐतिहासिक विजयाने लाखो भारतीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणले आणि त्यापैकी एक नाव म्हणजे भारतीय पुरुष संघाचा कर्णधार रोहित शर्मा.

महिला संघाच्या या यशानंतर रोहित शर्मा भावूक झाला आणि सोशल मीडिया व्हिडिओमध्ये त्याला इमोशनल पाहिले गेले. भारतीय मुलींनी देशाचा मान उंचावला असल्याचा अभिमान रोहितच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. “हा क्षण अवर्णनीय आहे. आज भारतीय क्रिकेटचा सुवर्ण दिवस,” असं त्याने व्यक्त केलं.

तिरंगा हातात घेत भारतीय महिला खेळाडू मैदानात साजरा करताच स्टेडियम “भारत माता की जय”च्या घोषणांनी दणाणून गेलं. शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या दमदार खेळीने भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. देशातील सेलिब्रिटी, क्रीडा दिग्गज आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर महिला खेळाडूंना शुभेच्छांचा वर्षाव केला.

हेही वाचा – 1,300 फुट उंचीवर लटकलेले.. जगातील सर्वात धोकादायक होटेल!  पाहा Video

रोहितसाठी हा क्षण विशेष होता, कारण त्याने अनेकदा मुलींच्या क्रिकेटला मिळत असलेल्या दुर्लक्षाबद्दल आवाज उठवला आहे. आज भारतीय कन्यांनी जगाच्या नकाशावर आपली छाप उमटवली आणि “Women In Blue” ही ताकद जगाला दाखवली.

हा विजय फक्त क्रिकेटचा नाही, तर प्रत्येक भारतीय स्त्रीच्या संघर्षाचा, स्वप्नांचा आणि सामर्थ्याचा आहे.

पहिली फलंदाजी करत भारताने 7 गडी गमावत 298 धावांचा भक्कम डोंगर उभा केला. या विजयाचे मुख्य शिल्पकार ठरल्या युवा ओपनर शेफाली वर्मा व ऑलराउंडर दीप्ती शर्मा. शेफालीने तुफानी खेळ करत 78 चेंडूंमध्ये 87 धावा ठोकल्या, तर दीप्ती शर्माने संयमी व तितकीच महत्वपूर्ण 58 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. स्मृती मंधाना (45) व ऋचा घोष (34) यांनीही महत्वाचे योगदान दिले.

299 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरुवात केली. बिट्स आणि लॉरा वूल्वार्ड्ट यांनी 51 धावांची भागीदारी केली. पण अमनजोत कौरच्या झपाट्याने फेकलेल्या थ्रोने बिट्सची विकेट घेतली आणि तिथून SA चा डाव गडगडत गेला.

लॉरा वूल्वार्ड्टने एकीकडे शतक (101) ठोकत झुंजार खेळ दाखवला, मात्र दीप्ती शर्माच्या जादुई गोलंदाजीसमोर त्यांचा बचाव कोसळला. दीप्तीने अवघ्या पाच विकेट्स घेत भारताचा विजय निश्चित केला.  

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment