क्रिकेटचा ‘हिटमॅन’ आता ‘डॉ. रोहित शर्मा’! चाहत्यांसाठी ऐतिहासिक क्षण

WhatsApp Group

Rohit Sharma Honorary Doctorate : भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय फलंदाजांपैकी एक असलेला रोहित शर्मा आता केवळ मैदानावरील विक्रमांसाठीच नव्हे, तर शैक्षणिक सन्मानासाठीही ओळखला जाणार आहे. पुण्यातील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ (Ajeenkya DY Patil University – ADYPU) यांनी रोहित शर्माला मानद डॉक्टरेट (Honorary Doctorate – D.Litt.) प्रदान करून गौरवले आहे.

हा सन्मान विद्यापीठाच्या 10व्या दीक्षांत समारंभात प्रदान करण्यात आला असून, रोहित शर्मा हा या कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला. क्रिकेटमधील त्याच्या अपार योगदानासाठी, नेतृत्वगुणांसाठी आणि तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरलेल्या प्रवासासाठी हा सन्मान देण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या अधिकृत निवेदनात सांगण्यात आले की, “रोहित शर्मा चाहत्यांसाठी ‘हिटमॅन’ असू शकतो, पण आज त्याच्या आयुष्यातील एक वेगळाच आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.”

हेही वाचा – कुत्रा फिरवण्यासाठी स्टेडियम रिकामं करणाऱ्या IAS अधिकाऱ्याचं दिल्लीत ‘ग्रँड कमबॅक’!

नेतृत्व, संयम आणि रणनीतीचा गौरव

अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष व कुलपती डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांनी स्वतः रोहित शर्माचा सन्मान केला. त्यांनी सांगितले की, “रोहित शर्मा म्हणजे केवळ आक्रमक फलंदाजी नव्हे, तर संयम, रणनीती आणि संकटातून उभे राहण्याची जिद्द. त्याचे हे गुण २०२६ च्या पदवीधर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहेत.”

क्रिकेटमधील चढ-उतार, अपयशातून मिळवलेले यश आणि संघाचे नेतृत्व करताना दाखवलेली परिपक्वता — या सगळ्यामुळे रोहित शर्मा आज फक्त खेळाडू नसून एक रोल मॉडेल बनला आहे.

सध्याची क्रिकेट कारकीर्द कुठे उभी आहे?

38 वर्षांचा रोहित शर्मा सध्या वनडे क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. त्याने आधीच टी-20 आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारताला 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला, आणि या मालिकेत रोहितला अर्धशतक झळकावता आले नाही.

तरीही, रोहित शर्माचे लक्ष्य स्पष्ट आहे. 2027 चा वनडे वर्ल्ड कप. मात्र, त्याच्या भविष्यातील स्थानाबाबत संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

IPL नंतर इंग्लंडविरुद्ध मैदानात पुनरागमन

IPL 2026 नंतर रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताकडून खेळताना दिसणार आहे. मैदानावर त्याचा अनुभव, तर मैदानाबाहेर त्याला मिळालेला हा मानद डॉक्टरेटचा सन्मान या दोन्ही गोष्टी रोहित शर्माला भारतीय क्रिकेटमधील एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व बनवतात.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment