VIDEO : मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये रोहित शर्मा अडकला, पण त्याने चाहत्यांची मनेही जिंकली!

WhatsApp Group

Rohit Sharma In Mumbai Traffic : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रोहित शर्मा सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा मुंबईच्या प्रचंड ट्रॅफिकमध्ये अडकलेला दिसतोय, मात्र या परिस्थितीतही त्याने आपल्या चाहत्यांसोबत जो सुंदर संवाद साधला, त्यामुळे नेटिझन्स त्याचं मनापासून कौतुक करत आहेत.

हा व्हिडीओ त्याच्या नवीन लाल रंगाच्या लेम्बोर्गिनी उरुस SE SUV मधून शूट करण्यात आला आहे. रोहित कारमध्ये बसून ट्रॅफिक कमी होण्याची वाट पाहत होता. त्याच्यासोबत अजून एक व्यक्तीही होती, ज्याच्याशी तो संवाद साधत होता. मात्र, जेव्हा त्याने पाहिलं की एक चाहता त्याचा व्हिडीओ शूट करत आहे, तेव्हा रोहितने अचानक त्याच्याकडे हात हलवला, ज्यामुळे तो चाहता अक्षरशः हरखून गेला.

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “मुंबई ट्रॅफिकमध्ये अडकलेले रोहित शर्मा आपल्या चाहत्याला हात हलवतो! ट्रेनिंग संपवून घरी जात होते. सोन्यासारखं मन असलेला माणूस – रोहित शर्मा!”

रोहित शर्मा आणि त्याची नवीन लेम्बोर्गिनी

रोहित शर्माने आपल्या जुन्या Lamborghini Urus गाडीला अपडेट करत Urus SE ही अत्याधुनिक परफॉर्मन्स SUV विकत घेतली आहे. या गाडीची एक्स-शोरूम किंमत 4.57 कोटी रुपये आहे. गाडीवर खास नंबर प्लेट “3015” आहे, ज्याचा रोहितच्या कुटुंबाशी आणि क्रिकेट कारकिर्दीशी खास संबंध आहे. याआधी त्याच्या गाडीचा नंबर “264” होता, जो त्याच्या वनडे कारकिर्दीतील सर्वोच्च स्कोअरशी संबंधित आहे, 264 धावांचा डोंगर त्याने श्रीलंकेविरुद्ध रचला होता.

Lamborghini Urus SE ही एक अत्याधुनिक SUV असून, ती 800 हॉर्सपावर इंजिन आणि 950 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार केवळ 3.4 सेकंदांत 0 ते 100 किमी/तास वेग पकडू शकते, ती वेग आणि लक्झरीचा परिपूर्ण संगम मानली जाते.

रोहित शर्मा टीम इंडियामध्ये पुन्हा कधी दिसणार?

ICC T20 World Cup 2024 जिंकल्यानंतर रोहित शर्माने T20I आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. इंग्लंडविरुद्ध टेस्ट सीरीजपूर्वी त्याने टेस्टला अलविदा केलं होतं. सध्या तो फक्त वनडे फॉरमॅटमध्ये खेळणार आहे.

भारतीय संघ ऑक्टोबर 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची ODI सीरीज खेळणार आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा पुन्हा एकदा टीम इंडियाची धुरा सांभाळताना दिसू शकतो.

तसेच, अशाही बातम्या समोर येत आहेत की इंडिया ए आणि ऑस्ट्रेलिया ए यांच्यातील अनौपचारिक वनडे सीरीज (सप्टेंबर-ऑक्टोबर 2025) मध्येही रोहित शर्मा सहभागी होण्याची शक्यता आहे. ही सिरीज ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी खेळली जाईल, ज्यामुळे चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment