Viral Video : सचिन तेंडुलकरचा साधेपणा पाहा..! घेतला टपरीवरच्या चहाचा आनंद

WhatsApp Group

Sachin Tendulkar Taking Tea On Road Side : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अलीकडे रोड ट्रिप दरम्यान अत्यंत आवश्यक असलेल्या टी ब्रेकचा आनंद घेताना दिसला. सचिनने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो एका दुकानातून चहा विकत घेताना दिसत आहे. त्याचवेळी त्याची कार रस्त्याच्या कडेला उभी होती. यादरम्यान सचिनने चाहत्यांसमोर चहा आणि टोस्टचे प्रेमही दाखवले.

या ब्रेकमध्ये सचिन तेंडुलकर चहा आणि टोस्टचा आनंद घेताना दिसला. यादरम्यान सचिनने आपला मुलगा अर्जुन तेंडुलकरलाही चहाचा कप दिला, जो कारमधून डोकावताना दिसत आहे. तेंडुलकर व्हिडिओमध्ये स्पष्ट करतो, की तो बेळगाव-गोवा एक्सप्रेसवेवर गाडी चालवत आहे. व्हिडीओमध्ये सचिन तेंडुलकर स्थानिकांशी बोलताना दिसत आहे. तिथे जाण्यापूर्वी चहावाल्यांसोबत सेल्फी घेण्यास सचिन विसरला नाही. इन्स्टाग्रामवर काही वेळातच हा व्हिडिओ व्हायरल झाला, जो लाखो लोकांनी पाहिला.

हेही वाचा – WhatsApp Communities Feature : व्हॉट्सअॅपनं आणलं नवीन फीचर..! आता येणार ‘खरी’ मजा

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या २०२२ मध्ये सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळताना दिसला होता. सचिनच्या नेतृत्वाखाली, इंडिया लिजेंड्सने दिग्गज श्रीलंकेच्या संघाचा ३३ धावांनी पराभव करून स्पर्धा जिंकली.

सचिनची कारकीर्द

सचिनची क्रिकेट कारकीर्द खूप चांगली राहिली आहे. त्याने २०० कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे, ज्यात त्याने ५३.७९च्या सरासरीने १५९२१ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये ४६३ सामने खेळले आहेत ज्यात त्याने ४४.८३च्या सरासरीने १८४२६ धावा केल्या आहेत. सचिनने आपल्या शानदार कारकिर्दीत ५१ कसोटी शतके आणि ४९ एकदिवसीय शतके झळकावली आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment