भारतीय बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रेंकीरेड्डीचा वर्ल्ड रेकॉर्ड! इतिहासातील मोठा पराक्रम

WhatsApp Group

Satwiksairaj Rankireddy Fastest Smash : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रेंकीरेड्डी याने सर्वात वेगवान स्मॅश करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. त्याने 565 किमी प्रतितास वेगाने स्मॅश मारला.सात्विकच्या स्मॅशचा वेग बुलेट ट्रेनपेक्षा जास्त होता. सात्विकने मलेशियाचा खेळाडू टॅन बून ह्योंगचा विक्रम मोडला आहे. ह्योंगने 10 वर्षांपूर्वी 2013 मध्ये 493 किमी प्रतितास वेगाने स्मॅश मारला होता. सात्विकने त्याचा साथीदार चिराग शेट्टीसह पुरुष दुहेरीत प्रवेश केला. अलीकडेच त्याने चिरागसह इंडोनेशिया ओपन-1000 चे विजेतेपद पटकावले.

महिला विभागात सर्वात वेगवान स्मॅशचा विक्रम मलेशियाच्या टेन पर्लीच्या नावावर आहे, जिने ताशी 438 किमी वेगाने शॉट मारला. या प्रसंगी जपानच्या क्रीडासाहित्य कंपनी योनेक्सने सांगितले की, योनेक्स बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रेंकीरेड्डी आणि टेन पर्ली यांनी पुरुष आणि महिला बॅडमिंटनमध्ये सर्वात वेगवान स्मॅशसह नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला आहे हे जाहीर करताना आम्हाला अभिमान वाटतो.

हेही वाचा – टाटा कंपनीचा स्टॉक निघाला रॉकेटसिंग! तब्बल 850 कोटी रुपयांची कमाई

जागतिक विक्रमासाठी हा प्रयत्न 14 एप्रिल 2023 रोजी झाला होता, ज्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत सदस्यांनी पुष्टी केली आहे. जपानमधील सोका येथील योनेक्स फॅक्टरी जिम्नॅशियममध्ये सात्विकने हा स्मॅश मारला.

सात्विकने त्याचा साथीदार चिराग शेट्टीसोबत कोरिया ओपनची दुसरी फेरी गाठली आहे. भारतीय जोडीने थायलंडच्या सुपाक जोमकोह आणि किटिनुपोंग केद्रान या जोडीचा 21-16, 21-14 असा पराभव केला. या विजयासह भारतीय जोडीने उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. सात्विक-चिरागने कोरिया ओपन जिंकल्यास ही जोडी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर येईल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment