

India vs Pakistan Asia Cup 2025 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी होणाऱ्या एशिया कप 2025 क्रिकेट सामन्यावरून आता देशांतर्गत राजकारण तापले आहे. विरोधकांनी या सामन्याच्या निमित्ताने केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली असून, आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली की, त्यांच्या पक्षातर्फे रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येणार आहे. हा सामना खेळवण्यास केंद्र सरकारने दिलेली परवानगी ही देशाच्या सुरक्षेशी प्रतारणा करणारी आहे, असा आरोप त्यांनी केला.
UddhavSaheb Thackeray #LIVE | पत्रकार परिषद | मातोश्री, मुंबई https://t.co/IsTNjRssHH
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) September 13, 2025
“क्रिकेट नाही, ही देशभक्तीची वेळ आहे” – उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले, “भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध केवळ क्रिकेटपुरते मर्यादित नाहीत. पाकिस्तानद्वारे भारतात सातत्याने होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आम्ही हा सामना स्वीकारू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच एकदा म्हटले होते की, ‘रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाहीत’. मग ‘रक्त आणि क्रिकेट’ एकत्र कसे वाहू शकतात?”
हेही वाचा – मृत्यूच्या दारात महिला, डिलिव्हरी बॉयने जीव वाचवला आणि झाला मालामाल!
ठाकरे पुढे म्हणाले की, हा सामना रद्द करण्याची मागणी आम्ही केंद्र सरकारकडे करत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रभर निदर्शने केली जातील.
राजकारणाची धग, देशभक्तीचा मुद्दा
या आंदोलनाद्वारे शिवसेनेचा हेतू क्रिकेटपेक्षा देशभक्ती मोठी आहे हे दाखवण्याचा आहे. पाकिस्तानचा सामना खेळणे म्हणजे त्याच्या दहशतवादी कृत्यांना अप्रत्यक्ष समर्थन देणे होईल, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.
शिवसेनेच्या आंदोलनामुळे रविवारचा सामना खेळवला गेला तरी त्यावर राजकीय सावली नक्कीच पडणार आहे. भाजप सरकारने यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा