VIDEO : झिरोवर गेला सिक्सर किंग..! वर्ल्डकप सिलेक्शननंतर शिवम दुबे पहिल्याच बॉलवर OUT

WhatsApp Group

Shivam Dube Golden Duck : चेन्नई सुपर किंग्जचा सिक्सर किंग शिवम दुबे प्रथमच भारतासाठी टी-20 वर्ल्डकप खेळणार आहे. जबरदस्त फॉर्म आणि प्रहार करण्याची क्षमता पाहून दुबेला संघात स्थान देण्यात आले. पण या सिलेक्शननंतर दुबे गोल्डन डकचा शिकार झाला आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात दुबेला खातेही खोलता आले नाही.

आयपीएलच्या 17 व्या हंगामात पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात पंजाबने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अजिंक्य रहाणेसोबत ऋतुराजने 64 धावांची भागीदारी केली. रहाणे गेल्यानंतर दुबे फलंदाजीला आला. पंजाबच्या हरप्रीत ब्रारला मारण्याच्या नादात पहिल्याच बॉलवर पायचीत झाला

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने आतापर्यंत 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत. हा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जने 9 पैकी 3 सामने जिंकले असून 9व्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – जगातील सर्वात श्रीमंत क्रिप्टो एक्सचेंज Binance च्या मालकाला तुरुंगवास!

दोन्ही संघांची Playing 11

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरेल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, दीपक चहर, रिचर्ड गिल्सन आणि मुस्तफिजुर रहमान.

पंजाब किंग्ज : जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन (कर्णधार), रिले रॉसो, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment