TNPL 2023 : अश्विन अन्नाची कमाल, घेतला अविश्वसनीय कॅच! पाहा Video

WhatsApp Group

TNPL 2023 : आयपीएल 2023 नंतर नंतर तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL 2023) खेळवली जात आहे. यामध्ये आयपीएलमध्ये सहभागी झालेले अनेक स्टार खेळाडू खेळत आहेत. TNPL 2023 मध्ये मदुराई पँथर्स आणि डिंडीगुल ड्रॅगन्स यांच्यात सामना झाला. सामना फारसा वादळी नसला तरी एका झेलने मात्र खळबळ माजवली. हा झेल अन्य कोणी नसून अश्विनने घेतला आहे. अश्विनने पाठीमागे धावताना हवेत उडी मारली आणि झेल पकडला. क्रिकेटमध्ये असे झेल क्वचितच पाहायला मिळतात.

आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की 36 वर्षीय रवीचंद्रन अश्विन इतका चपळ कधीपासून झाला की तो हवेत उडणारे झेल पकडतो? मात्र हा झेल मुरुगन अश्विनने घेतला आहे. आयपीएल 2023 मध्ये तो आर अश्विनसह राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता. त्याच वेळी, तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये, तो मदुराई पँथर्स संघाचा भाग आहे आणि रवीचंद्रन अश्विन डिंडीगुल ड्रॅगन्सचे नेतृत्व करत आहे.

हेही वाचा – ‘या’ ठिकाणी फक्त 1.5 रुपयाला मिळतं पेट्रोल! तुम्हाला माहितीये का?

सामन्यात डिंडीगुल ड्रॅगन्सची फलंदाजी सुरू होती. पॉवरप्ले सुरू होता. डिंडीगुल ड्रॅगन्सच्या डावातील चौथे षटक मदुराई पँथर्सचा वेगवान गोलंदाज गुर्जपनीत सिंग टाकत होता, ज्याने 2 बळी घेतले होते. आपल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर डिंडीगुलचा फलंदाज एस अरुणने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू त्याच्या बॅटवर आला नाही आणि कव्हर्सच्या दिशेने हवेत उंच गेला.

सुरुवातीला नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडेल असे वाटत होते. अश्विनने झेल पकडण्यासाठी धाव घेतली. पण, चेंडू ज्या वेगाने हवेत गेला, ते पाहता कोणीही तो पकडू शकेल, असे वाटत होते. पण, मुरुगन चेंडूच्या जवळ पोहोचला आणि चेंडू खाली पडण्यापूर्वीच हवेत उडी मारत झेल पकडला.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर मदुराई पँथर्सने प्रथम फलंदाजी करताना 123 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात डिंडीगुल ड्रॅगन्स संघाने 35 चेंडू आणि 7 गडी राखून 124 धावांचे लक्ष्य गाठले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment