Suryakumar Yadav And Wife Interview : भारताने टी-20 विश्वचषक 2026 जिंकल्यानंतर अनेक भावनिक आणि प्रेरणादायी गोष्टी समोर येत आहेत. अशाच एका खास क्षणाचा खुलासा भारतीय कर्णधार Suryakumar Yadav ची पत्नी देवीशा यादवने केला आहे.
प्रसिद्ध क्रीडा अँकर Jatin Sapru यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, सेमीफायनलनंतरची रात्र सूर्यकुमार यादवसाठी अत्यंत महत्त्वाची होती.
“पहाटे 5 वाजता उठले तर सूर्या रूममध्ये नव्हता”
सूर्यकुमार यादवच्या पत्नीने सांगितले की त्या रात्री तिलाही झोप लागत नव्हती. “मी पहाटे सुमारे 5 वाजता उठले, तेव्हा सूर्या खोलीत नव्हता. नंतर समजले की तो पूर्ण रात्र संघातील खेळाडूंशी चर्चा करत होता,” असे तिने सांगितले. विशेष म्हणजे सूर्या त्या रात्री Abhishek Sharma आणि Varun Chakravarthy यांच्यासोबत बराच वेळ घालवत होता.
अभिषेक आणि वरुण निराश होते
स्पर्धेदरम्यान त्यांच्या कामगिरीबाबत दोन्ही खेळाडू समाधानी नव्हते. त्यामुळे ते थोडे निराश होते. मात्र कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवने त्यांच्याशी दीर्घ संवाद साधत त्यांचा आत्मविश्वास वाढवला.
“माझं 2025 खूप वाईट गेलं होतं…”
सूर्यकुमार यादवने अभिषेक शर्माला सांगितलेली गोष्ट विशेष चर्चेत आहे. “माझं 2025 वर्ष खूप खराब गेलं होतं. मी भारतासाठी एकही अर्धशतक करू शकलो नव्हतो. त्यामुळे तुमची परिस्थिती मला चांगली समजते,” असे सूर्या त्याला म्हणाला.
“तू आठ वेळा शून्यावर बाद झाला तरी फायनल तूच खेळशील”
अभिषेक शर्मा निराश असताना सूर्याने त्याला मोठा आत्मविश्वास दिला. त्याने स्पष्ट सांगितले, “तू आठ वेळा शून्यावर बाद झाला तरीही फायनलमध्ये तूच खेळशील.” त्याचप्रमाणे त्याने वरुण चक्रवर्तीला देखील सांगितले, “तू चार षटकांत 70 धावा दिल्यास तरी फायनलमध्ये तूच खेळशील.”
कर्णधाराची खरी ताकद
सूर्यकुमार यादवला या दोन्ही खेळाडूंच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. त्याने सांगितले की हे दोघेही अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहेत आणि योग्य वेळ आली की त्यांचा खेळ नक्कीच चमकेल. कर्णधार म्हणून त्याने दाखवलेला हा विश्वास आणि नेतृत्वच भारताच्या विश्वचषक विजयामागील एक मोठे कारण मानले जात आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा