

T20 World Cup 2022 IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना मेलबर्नमध्ये खेळवला जात आहे. कालपर्यंत या सामन्यात पाऊस ठरणार असणार, असे वाटत होते, पण देशांचा थरार वरुणराजाला कळला असावा. त्यामुळेच सामन्याचा दिवस जवळ येताच त्याने आपला दृष्टिकोन बदलला. या आनंदात त्यामुळेच भारत-पाक महासंग्रामापूर्वी मेलबर्नमध्ये लुंगी डान्स हे गाणे वाजवले गेले आणि चाहते त्यावर नाचताना दिसले.
भारत-पाक सामन्यादरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. या या व्हिडिओमध्ये भारतीय चाहते लुंगी डान्स या प्रसिद्ध बॉलिवूड गाण्यावर नाचताना दिसत आहेत. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे. ”लुंगी डान्स विभाग आणि भांगडा बटालियनचे सामर्थ्य पाहता, भारताने आधीच मॅचपूर्व फॅन सपोर्टचा विश्वचषक जिंकलेला दिसतो”, असे महिंद्रांनी आपल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. या सामन्यात भारतीय कप्तान रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
हेही वाचा – IND Vs PAK : राष्ट्रगीतादरम्यान रोहित शर्माची ‘ती’ भावना कॅमेऱ्यात कैद..! पाहा VIDEO
Given the strength of the Lungi Dance Division & the Bhangra Battalion, India appears to have already won the #T20WC2022 World Cup of Pre-match Fan Support… pic.twitter.com/hiLuHzqSIP
— anand mahindra (@anandmahindra) October 23, 2022
दोन्ही संघांची Playing 11 :
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!