T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकपमध्ये सुपर ओव्हर..! रोमांचक सामन्यात नामिबियाचा ओमानवर विजय

WhatsApp Group

T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक सुरु झाला आहे. तिसरा सामना ओमान आणि नामिबिया यांच्यात झाला. या सामन्यात नामिबियाने सुपर ओव्हरमध्ये शानदार विजयाची नोंद केली. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ओमानच्या संघाला 19.4 षटकांत 109 धावा करता आल्या. पाठलाग करताना नामिबियानेही 20 षटकांत 109 धावा केल्या. या सामन्याचा निर्णय सुपर ओव्हरने झाला.

नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरेमसने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ओमानचा संघ प्रथम फलंदाजीला आला. ओमानचे सलामीवीर कश्यप प्रजापती आणि नसीम खुशी स्वस्तात बाद झाले. कश्यपने 0 धावा केल्या तर नसीमने 6 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या कर्णधार आकिब ल्यासने पहिल्याच चेंडूवर विकेट दिली. झिसान मकसूद आणि खलील कैल यांनी ओमानचा डाव सांभाळला. झिसानने 22 तर खलीलने 34 धावा केल्या. तर अयान खानने 15 धावा केल्या. अशाप्रकारे त्यांचा संघ 20 षटकांत केवळ 109 धावा करू शकला.

हेही वाचा – Odisha Heatwave : ओडिशामध्ये उकाड्याचा कहर..! 72 तासांत 99 जणांचा मृत्यू

नामिबियासाठी, 26 वर्षीय गोलंदाज रुबेन ट्रम्पलमनने 4 षटकात शानदार गोलंदाजी केली आणि एकूण 4 बळी घेतले. डेव्हिड व्हीजेने 3 बळी घेतले. बर्नार्ड स्कोल्झने 1, तर गेर्हार्ड इरास्मसने 2 विकेट घेतल्या. आता पाठलाग करण्याची नामिबियाची पाळी होती. नामिबियासाठी निकोलस डेव्हलिन आणि जॅन फ्रायलिंक यांच्यात चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. मात्र दोघे बाद झाल्यानंतर संघाची दुरवस्था झाली आणि विकेट पडत राहिल्या. मेहरान खानने शेवटच्या षटकात 2 बळी घेतले. शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नामिबियाला 2 धावांची गरज होती. मात्र त्याला केवळ 1 धाव करता आली. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला.

सुपर ओव्हरमध्ये नामिबिया प्रथम फलंदाजीला आला. डेव्हिड व्हीजे आणि कर्णधार गेरहार्ड इरेमसच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर त्याने 21 धावा केल्या. मात्र ओमान संघ त्याचा पाठलाग करू शकला नाही. अशा प्रकारे या सामन्यात ओमानला पराभवाला सामोरे जावे लागले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment