AFG vs IND : कठीण खेळपट्टीवर सूर्या तळपला, अफगाण संघाला 182 रन्सचे टार्गेट!

WhatsApp Group

AFG vs IND : टी-20 वर्ल्डकप सुपर 8 च्या भारतीय संघाचा पहिला सामना अफगाणिस्तानशी होत आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सूर्यकुमार यादवचे अर्धशतक आणि हार्दिक पांड्याच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 8 गडी गमावून 181 धावांपर्यंत मजल मारली.

अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात भारताने एका मोठ्या बदलासह प्रवेश केला आहे. या स्पर्धेत प्रथमच कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला बाहेर बसवण्यात आले आहे. या सामन्यासाठी अफगाणिस्तान संघातही एक बदल करण्यात आला आहे. करीम जनातच्या जागी हजरतुल्ला झाझाईचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

रोहित-विराट फ्लॉप, सूर्याचे अर्धशतक

नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र तो संघाला चांगली सुरुवात करून देऊ शकला नाही. अवघ्या 8 धावा केल्यानंतर तो फजल हक फारुकीच्या चेंडूवर राशिद खानकरवी झेलबाद झाला. पहिली विकेट पडल्यानंतर ऋषभ पंत मैदानात उतरला आणि त्याच्याच शैलीत सुरुवात केली. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात आलेल्या मोहम्मद नबीने सलग तीन चौकार मारले. राशिद खानने त्याला आपल्या फिरकीत अडकवले आणि 11 चेंडूत 20 धावांची खेळी संपुष्टात आली. विराट कोहलीच्या रूपाने भारताला तिसरा धक्का बसला. 24 चेंडूत तेवढ्याच धावा केल्यानंतर तो राशिदच्या चेंडूवर मोहम्मद नबीकडे झेलबाद झाला. यानंतर शिवम दुबेला राशिदने पायचीत पकडले.

हेही वाचा – शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मोठी घोषणा, NEET परीक्षा रद्द होणार नाही!

सूर्यकुमार यादवचे अर्धशतक

अडचणीत सूर्यकुमार यादव धावून आला आणि त्याने भारतीय संघासाठी शानदार खेळी केली. त्याने अवघ्या 27 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने या अर्शतक पूर्ण केले. पण तो आपला डाव पुढे नेऊ शकला नाही आणि 28 चेंडूत 53 धावा करून बाद झाला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :

भारत – रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.

अफगाणिस्तान – रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान, नजीबुल्ला झाद्रान, हजरतुल्ला झाझई, गुलबदिन नैब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, राशिद खान (कर्णधार), नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment