टीम इंडियाच्या जर्सीवर ‘या’ कंपनीचे नाव, BCCI कडून 2027 पर्यंतची प्रायोजकत्व डील जाहीर!

WhatsApp Group

Team India Sponsor : भारतीय क्रिकेट संघासाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. एशिया कप 2025 च्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाच्या जर्सीचा नवा प्रायोजक समोर आला आहे. आता ‘ड्रीम 11’ची जागा घेणार आहे देशातील प्रसिद्ध टायर कंपनी – अपोलो टायर्स. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि अपोलो टायर्स यांच्यात 2027 पर्यंतचा प्रायोजकत्व करार झाला आहे.

1 सामन्यासाठी मिळणार तब्बल 4.5 कोटी रुपये!

मिळालेल्या माहितीनुसार, या नव्या कराराअंतर्गत अपोलो टायर्स BCCI ला प्रत्येक सामन्यासाठी सुमारे 4.5 कोटी रुपये देणार आहे. ही रक्कम मागील प्रायोजक ‘ड्रीम 11’च्या तुलनेत 50 लाखांनी जास्त आहे. ड्रीम 11 प्रत्येक सामन्यासाठी 4 कोटी रुपये देत होते.

मोठ्या स्पर्धेत बाजी मारली

टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, टीम इंडियाच्या जर्सी प्रायोजक होण्यासाठी ‘कॅनवा’, ‘जेके टायर्स’ आणि ‘बिर्ला ऑप्टस पेन्ट्स’ या कंपन्याही रेसमध्ये होत्या. मात्र, अपोलो टायर्सने सर्व स्पर्धकांना मागे टाकत ही डील आपल्या नावावर केली आहे.

16 सप्टेंबरला लागली बोली, BCCI ने ठरवले निकष

BCCI ने 2 सप्टेंबर 2025 रोजी बोलीसाठी खुली सूचना दिली होती आणि 16 सप्टेंबरला स्पॉन्सरशिपची बोली लावण्यात आली. यामध्ये BCCI ने स्पष्ट केलं होतं की, गेमिंग, बेटिंग, क्रिप्टोकरन्सी व तंबाखू उद्योगाशी संबंधित कंपन्या या स्पॉन्सरशिपसाठी पात्र ठरणार नाहीत. तसेच बँकिंग, फायनान्स व स्पोर्ट्सवेअर कंपन्यांनाही या प्रक्रियेत सहभागी होता येणार नव्हते.

हेही वाचा – Jan Aushadhi Kendra : २०% कमिशन, ₹१५,००० प्रोत्साहन! जाणून घ्या जन औषधी केंद्र कसं सुरू करायचं

नवीन जर्सीवर अपोलोचा लोगो कधीपासून?

सध्या टीम इंडिया एशिया कप 2025 मध्ये भाग घेत आहे, जो युएईतील अबू धाबी आणि दुबई येथे खेळवला जात आहे. यावेळी भारतीय संघ जर्सीवर कोणताही लोगो न लावता खेळत आहे. तथापि, अपोलो टायर्सचा लोगो या स्पर्धेनंतरच्या सामन्यांमध्ये भारतीय जर्सीवर झळकण्याची शक्यता आहे.

2027 पर्यंतचा प्रायोजकत्व कालावधी

या डीलअंतर्गत भारतीय संघ पुढील दोन वर्षांत सुमारे 130 सामने खेळणार आहे. त्यासाठी अपोलो टायर्सकडून संपूर्ण कराराचा एकूण आकडा कोट्यवधींच्या घरात जाणार आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment