Jan Aushadhi Kendra : २०% कमिशन, ₹१५,००० प्रोत्साहन! जाणून घ्या जन औषधी केंद्र कसं सुरू करायचं

WhatsApp Group

Jan Aushadhi Kendra : केंद्र सरकारने जनतेसाठी मोठा निर्णय घेत, आता मेट्रो शहरांतील प्रत्येक गल्लीत जन औषधी केंद्र उघडण्यास मोकळीक दिली आहे. 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये जन औषधी केंद्रांदरम्यान असणाऱ्या किमान अंतराची अट रद्द करण्यात आली आहे. हा बदल 10 सप्टेंबर 2025 पासून लागू झाला असून यामुळे सामान्य नागरिकांना स्वस्त आणि गुणवत्तापूर्ण औषधे सहज उपलब्ध होणार आहेत.

सरकारचे उद्दिष्ट आहे, की 31 मार्च 2027 पर्यंत 25,000 जन औषधी केंद्रे देशभरात सुरू करायची. सध्या देशात सुमारे 17,000 जन औषधी केंद्रे कार्यरत असून त्यामध्ये 2,047 प्रकारच्या औषधांचा आणि 300 सर्जिकल वस्तूंचा समावेश आहे.

कोणत्या शहरांमध्ये बदल लागू झाला आहे?

दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद आणि अहमदाबाद या प्रमुख महानगरांमध्ये आता जवळपास केंद्रे उघडता येणार आहेत. याशिवाय 46 मोठ्या शहरांमध्येही अंतराची अट रद्द करण्यात आली आहे.

योजनेचे फायदे काय आहेत?

  • बाजारात 100-200 रुपयांना मिळणाऱ्या औषधी जन औषधी केंद्रांमध्ये 20-50 रुपयांना मिळतात.
  • सरकारचा दावा आहे की, इथे मिळणारी औषधे ब्रँडेड औषधांपेक्षा 50 ते 90% पर्यंत स्वस्त असतात.
  • शहरी भागांतील drug deserts म्हणजे औषधांची अनुपलब्धता कमी होईल.
  • सामान्य माणसाच्या आरोग्यावरील खर्चात लक्षणीय घट होईल.
  • केंद्रे उघडल्यामुळे उद्योग व रोजगाराच्या संधी वाढतील.

जन औषधी केंद्र उघडण्यासाठी अटी

बाबतपशील
पात्रताD Pharma किंवा B Pharma
जागाकिमान 120 चौ.फुट
पात्र कॅटेगरीडॉक्टर, फार्मासिस्ट, NGO, ट्रस्ट, खासगी हॉस्पिटल, राज्य सरकार नियुक्त संस्था
अर्ज फी₹5,000

सरकारी मदत

  • विक्रीच्या 15% पर्यंत दरमहा प्रोत्साहन (कमाल ₹15,000)
  • विशेष श्रेणीसाठी एकरकमी ₹2 लाख
  • फर्निचरसाठी ₹1.5 लाख आणि संगणकासाठी ₹50,000
  • औषधांच्या विक्रीवर 20% पर्यंत कमिशन

अर्ज प्रक्रिया – स्टेप बाय स्टेप मार्गदर्शक

  1. अधिकृत वेबसाईट: janaushadhi.gov.in
  2. ‘Apply for Kendra’ वर क्लिक करा.
  3. नवीन अकाउंट तयार करा किंवा लॉगिन करा.
  4. अर्ज फॉर्म भरा, आवश्यक कागदपत्रे (PDF, 5MB खाली) अपलोड करा.
  5. दुकानाचा पत्ता लोकेशन मॅपवर टॅग करा.
  6. ₹5,000 शुल्क ऑनलाइन भरून अर्ज सबमिट करा.

अर्जानंतर ईमेलद्वारे पुष्टी मिळेल. स्टेटस पाहण्यासाठी पोर्टलवर लॉगिन करू शकता किंवा 1800 180 8080 हेल्पलाईनवर संपर्क साधू शकता.

किती कमाई होऊ शकते?

  • जर एका महिन्यात ₹5 लाखांची औषधविक्री झाली, तर ₹15,000 प्रोत्साहन मिळू शकते.
  • औषधविक्रीवर 20% पर्यंत कमिशन मिळतो.
  • याशिवाय सरकारच्या सवलती आणि ग्राहकांची मागणी पाहता हे एक सामाजिक सेवेसोबत नफा कमावणारे मॉडेल ठरते.

सामान्य लोकांचा अनुभव काय आहे?

छपरा जिल्ह्यातील इबरार अहमद सांगतात की, “पूर्वी लोक महागड्या औषधांनी हताश व्हायचे, आता समाधानी होऊन घरी जातात.” ग्राहक हरेंद्र सिंह म्हणतात, “पूर्वी ₹500 ची औषधं लागत होती, आता ₹80 मध्ये काम होते.” दीदार वारिस यांचंही अनुभव असाच आहे की, बाजारातील ₹200 ची औषधं केंद्रात ₹50 मध्ये मिळतात.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment