Team India New Jerseys : टीम इंडियाची नवीन जर्सी लाँच…! काश्मीरशी ‘असं’ कनेक्शन

WhatsApp Group

Team India New Jerseys : 7 जूनपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC Final) दुसऱ्या हंगामाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ नवी जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाचा नवीन किट प्रायोजक Adidas ने 1 जून रोजी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओद्वारे तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या जर्सी लाँच केल्या आहेत. भारतीय संघाच्या या नव्या जर्सीचे कनेक्शन काश्मीरशीही आहे.

टीम इंडियाची ही नवीन जर्सी समोर आल्यानंतर तिच्या डिझाईनचे सर्वत्र कौतुक होत आहे. हे डिझाइन करण्यात काश्मिरी डिझायनरची भूमिका खूप महत्त्वाची आहे. काश्मीरमधील आकिब वानी यांनी भारतीय संघाची ही नवीन जर्सी डिझाईन केली आहे. टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटच्या जर्सीमध्ये 3-3 पट्टे देखील देण्यात आले आहेत, ज्यामुळे ते खूपच नेत्रदीपक दिसते.

हेही वाचा – Odisha Train Accident : भयानक अपघात आणि मृत्यूचं तांडव! ज्युनियर NTR म्हणाला, “प्रत्येक माणसासोबत….”

मे महिन्याच्या अखेरीस, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2028 पर्यंत किट प्रायोजक म्हणून Adidas सोबत करार केला. आदिदास भारतीय पुरुष संघाव्यतिरिक्त भारतीय महिला संघ आणि अंडर-19 महिला आणि पुरुष संघांनाही जर्सी द्यावी लागेल.

MPL चा करार संपुष्टात आल्याने Adidas ची एंट्री

2020 मध्ये, मोबाइल गेमिंग कंपनी MPL ने भारतीय संघाचा किट प्रायोजक म्हणून करार केला होता, जो 2023 च्या शेवटपर्यंत चालणार होता. पण एमपीएलने हा करार मध्यंतरी संपवण्याचा निर्णय घेतला. यानंतर बीसीसीआयने किलरला 3 महिन्यांसाठी भारतीय संघाचा किट प्रायोजक म्हणून करारबद्ध केले होते. मार्चमध्ये ऑस्ट्रेलियासोबतच्या मालिकेसह हा करार संपला. यानंतर आता BCCI ने Adidas सोबत 2028 पर्यंत करार केला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment