VIDEO : प्लॅन करून OUT कसं करायचं हे विराट-सिराजने दाखवलं, पाहा मार्को जानसेनची विकेट!

WhatsApp Group

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने झंझावाती सुरुवात केली आहे. सामन्याच्या (SA vs IND 2nd Test) पहिल्याच दिवशी लंचपूर्वी भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेला पहिल्या डावात 23.2 षटकात फक्त 55 धावांत ऑलआऊट केले. केपटाऊन येथे रंगत असलेल्या सामन्यात आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आफ्रिकेची स्थिती बिघडवण्यात मोहम्मद सिराजने सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. सिराजने घातक स्पेल टाकत आफ्रिकेचे कंबरडे मोडले. जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनीही सिराजला चांगली साथ दिली.

भारतीय संघाने मालिकेतील पहिला कसोटी लाजिरवाण्या पद्धतीने गमावला. पण त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने आफ्रिकेची सुरुवात बिकट केली. या सामन्यात सिराजने 9 षटकात 15 धावा देत 6 विकेट्स काढल्या. जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार या वेगवान गोलंदाजांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. आफ्रिकेचे 9 फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. आफ्रिकेचा विकेटकीपर बॅटर काइल वेरेनने संघासाठी सर्वाधिक 15 धावा केल्या.

हेही वाचा – ठरलं..! रोहित, विराट खेळणार टी-20 वर्ल्डकप, ‘अशी’ निवडली जाणार टीम इंडिया

विराटचा प्लॅन सिराजची विकेट!

या सामन्याच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू मार्को जानसेनची विकेट सर्वांच्या लक्षात राहण्यासारखी ठरली. स्लीपमध्ये तैनात असलेल्या विराट कोहलीने जानसेनसाठी सिराजला आऊटस्विंगर टाकण्यास सांगितले. पुढच्याच चेंडूवर सिराजने जानसेनला विकेटकीपर राहुलकरवी आऊटस्विंगरवर झेलबाद केले. जानसेनला खातेही खोलता आले नाही. विराटच्या या प्लॅनिंगचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment