VIDEO : अक्षर पटेलने घेतला ‘कॅच ऑफ द टूर्नामेंट’, लेफ्टी असूनही सुटला नाही बॉल!

WhatsApp Group

Axar Patel Catch : टी-20 वर्ल्डकप 2024 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चारत सेमीफायनलमध्ये धडक दिली. या सामन्यात भारताने क्षेत्ररक्षणात काही चुका केल्या, पण मोक्याच्या क्षणी भारतीय झेल पकडले. यात खास ठरला अक्षर पटेलने घेतलेला झेल. ऑस्ट्रेलियाचा घातक कप्तान मिचेल मार्शचा अक्षरने एकहाती जबरदस्त झेल घेतला.

अक्षरच्या या झेलचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारताकडून कुलदीप यादवने 9वे षटक टाकले. या षटकातील शेवटच्या चेंडूवर मिचेल मार्शने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. सीमारेषेवर सावध असलेल्या अक्षर पटेलने योग्य वेळी उडी मारली आणि चेंडू त्याच्या हातात आला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेफ्टी असूनही अक्षरने उजव्या हाताने झेल पूर्ण केला. याआधी मार्शला दोनदा जीवनदान मिळाले.

हेही वाचा – ‘हिटमॅन’ तुफानामुळं भारतानं ऑस्ट्रेलियाला नमवलं, वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये धडक!

कप्तान रोहित शर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने टी-20 वर्ल्डकप 2024 च्या सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 24 धावांनी मात दिली. सेंट लुसियात खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला 206 धावांचे आव्हान दिले. पण ऑस्ट्रेलियाला 181 धावांपर्यंत पोहोचता आले. भारताकडून रोहितने सलामीला येत 41 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकारांसह 92 धावांची खेळी केली.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment