WI vs IND 1st Test : वेस्ट इंडिजने जिंकला टॉस! भारताकडून ‘या’ दोघांचे पदार्पण

WhatsApp Group

WI vs IND 1st Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेला आज बुधवारपासून सुरुवात होत आहे. पहिला कसोटी सामना विंडसर पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताकडून इशान किशन आणि यशस्वी जयस्वाल यांनी पदार्पण केले आहे.

भारताची कमान ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या हाती आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेट आहे. दोन्ही संघांसाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023-25 ​​सायकलची ही पहिली मालिका आहे. गेल्या महिन्यात 2021-23 च्या WTC फायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. पराभवानंतर भारतीय संघ पहिला सामना खेळणार आहे.

दोन्ही संघांचा रेकॉर्ड

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत एकूण 98 कसोटी सामने खेळले गेले आहेत. भारताने 22 आणि वेस्ट इंडिजने 30 कसोटी जिंकल्या. 46 सामने अनिर्णित राहिले. गेल्या दोन दशकांत वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचे पारडे जड आहे. वेस्ट इंडिज संघाने शेवटची कसोटी 2002 मध्ये भारताविरुद्ध जिंकली होती. त्या वर्षी वेस्ट इंडिजने पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-1 ने जिंकली. दोन सामने अनिर्णित राहिले. ही मालिका वेस्ट इंडिजमध्ये खेळली गेली. तेव्हापासून भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध एकही कसोटी सामना गमावलेला नाही किंवा कसोटी मालिकाही गमावलेली नाही.

हेही वाचा – गुंतवणुकीसाठी लै भारी संधी! ‘या’ बँकेचा IPO आज उघडला; लक्षात घ्या गोष्टी!

दोन्ही संघांची Playing 11

भारत : रोहित शर्मा (कप्तान), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.

वेस्ट इंडिज : क्रेग ब्रॅथवेट (कप्तान), टेगनारायन चंदरपॉल, रेमन रेफर, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment