World Cup 2023 : झिम्बाब्वे वर्ल्डकपमधून OUT! स्कॉटलंडचा थरारक विजय

WhatsApp Group

ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये स्थान मिळवण्यासाठी खेळल्या जात असलेल्या पात्रता (Qualifier) फेरीत झिम्बाब्वेच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. स्कॉटलंडविरुद्धच्या (ZIM vs SCO) पराभवामुळे त्यांची भारतात होणाऱ्या विश्वचषकात स्थान मिळवण्याची शक्यता धूसर झाली आहे. श्रीलंकेच्या संघाने याआधी स्पर्धेचे तिकीट निश्चित केले होते. मंगळवारी स्कॉटलंडविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात 235 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघ 203 धावांवर ऑलआऊट झाला.

स्कॉटलंडविरुद्धच्या करा किंवा मराच्या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. घातक गोलंदाजी करताना शॉन विल्यम्सने 10 षटकांत 41 धावांत 3 बळी घेतले, तर तेंडाई चताराने दोन बळी घेतले. स्कॉटलंडकडून मायकेल लीस्कने शेवटच्या सामन्यात 48 धावांची शानदार खेळी केली तर यष्टीरक्षक मॅथ्यू क्रॉसने 38 धावा केल्या. या दोन डावांच्या जोरावर संघाला 8 गड्यांच्या मोबदल्यात 234 धावांपर्यंत मजल मारता आली.

हेही वाचा – टाटांनी पुन्हा जिंकली मनं! लोकांना केलं खास अपील; नक्की वाचा!

शॉन विल्यम्स आणि सिकंदर रजासारखे स्टार्स झिम्बाब्वेसाठी करा किंवा मराच्या सामन्यात फ्लॉप झाले. या कठीण सामन्यात दोन्ही संघ धावा करतील अशी अपेक्षा होती, मात्र शॉन 12 आणि सिकंदर 34 धावा करून परतले. कर्णधार क्रेग आयर्विनला केवळ 2 धावा करता आल्या. रायन बर्लने एका टोकाला एकटा उभा राहून अर्धशतक पूर्ण केले. त्याला वेस्ली मधवरेची साथ लाभली पण 40 धावा केल्यानंतर त्याची विकेट गेली. झिम्बाब्वेची शेवची विकेट 203 धावांवर पडली आणि त्यांना 31 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. स्कॉटलंडकडूवन ख्रिस सोलने सर्वाधिक 3 बळी घेतले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment