९ महिन्याचं बाळ घेऊन २५०० मीटर पर्वतावर चढले आई-वडील! पुढे जे घडलं ते वाचून अंगावर काटा येईल…

WhatsApp Group

Baby Mountain Climb :  पोलंडच्या ‘माउंट रिसी’ या देशातील सर्वात उंच शिखरावर (Mount Rysy, 2500 मीटर) एका लिथुआनियाई दाम्पत्याने फक्त 9 महिन्याचं बाळ घेऊन चढाई करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण युरोप हादरला असून, सोशल मीडियावर लोकांनी या पालकांच्या अविचारी आणि धोकादायक निर्णयाची जोरदार निंदा केली आहे.

‘TVP World’च्या अहवालानुसार, या दाम्पत्याने हवामानाची आणि सुरक्षा सूचना पूर्णपणे दुर्लक्ष केलं. शनिवारी पोलंडमधील प्रसिद्ध पर्वतगाइड सिजमन स्टोच (Szymon Stoch) एका हायकिंग ग्रुपसोबत त्याच मार्गावर होता. तेव्हा त्यांची या दाम्पत्याशी भेट झाली. तेव्हा पर्वतीय मार्गावर बर्फाची जाड थर चढलेली होती, ज्यामुळे ट्रेकिंग अत्यंत जोखमीचं ठरत होतं.

गाइड स्टोच यांनी, तसेच एक स्लोव्हाक पर्वत बचावकर्ता आणि पर्वतावरच्या ‘Chata Pod Rysami’ या झोपडीतील कर्मचाऱ्यांनी त्या दाम्पत्याला वारंवार सांगितलं – “तुमच्याकडे लहान मूल आहे, कृपया चढाई थांबवा.” मात्र, त्या दाम्पत्याने सर्व चेतावण्या दुर्लक्षित करून पर्वत सर करण्याचा हट्टच धरला.

शिखरावर पोहोचल्यानंतर मात्र त्यांना समजलं की खाली उतरणं किती अत्यंत धोकादायक ठरू शकतं. परिस्थिती इतकी बिकट झाली की त्यांनी गाइड स्टोच यांना मदतीसाठी हाक दिली. त्यावेळी प्रश्न होता “जगण्याचा की मृत्यूचा”.

गाइड स्टोच यांनी तत्काळ निर्णय घेतला आणि स्वतः त्या 9 महिन्यांच्या बाळाला उचलून एकेक पाऊल टाकत, अत्यंत सावधपणे बर्फाच्छादित उतारावरून खाली आणलं. त्याच्या धैर्यामुळे त्या बाळाचा जीव वाचला.

‘Tatra Maniak’ या फेसबुक पेजनुसार, “गाइडने पूर्ण लक्ष केंद्रित करून, प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकत त्या बालकाला खाली आणलं. त्या मुलाला मृत्यूच्या दारातून बाहेर काढलं,” असं लिहिलं आहे.

या संपूर्ण घटनेनंतर सोशल मीडियावर जगभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. लोक म्हणतायत, “आपल्या आनंदासाठी मुलाचं आयुष्य धोक्यात टाकणं ही पालकत्वाची जबाबदारी नव्हे.”

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment