हे खरंच घडलंय! चिमुकल्याने विषारी सापाला दातांनी मारलं, डॉक्टरही म्हणाले, “अविश्वसनीय!”

WhatsApp Group

Bihar 2 Year Old Boy Kills Snake With Teeth : एखाद्या सिनेमातल्या सीनसारखी घटना बिहारच्या मझौलिया प्रखंडातील बनकटवा गावात घडली आहे. अवघ्या दोन वर्षांच्या गोविंदा कुमारने विषारी सापाला दातांनी चावून ठार केल्याची घटना समोर आली आहे. ही गोष्ट समजताच डॉक्टरसुद्धा चक्रावलेत.

सुनील शाह यांचा मुलगा गोविंदा घराच्या मागील अंगणात खेळत होता. त्याचवेळी लाकडांच्या ढिगाऱ्यातून एक विषारी नाग बाहेर आला. गोविंदाने तो पाहताच आधी त्याला विटेच्या तुकड्याने मारलं आणि मग थेट हातात घेऊन दातांनी चावून टाकलं. हे पाहून कुटुंबीय धावत आले, पण तोपर्यंत सापाचा अंत झाला होता.

हेही वाचा – पतीकडून दररोज 1160 रुपये उकळणारी पत्नी? तिचा ‘बिजनेस’ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ!

सावधगिरीने तात्काळ उपचार: गोविंदा बेशुद्ध पडल्याने त्याला लगेच स्थानिक PHC मध्ये नेण्यात आलं. नंतर गंभीर स्थिती लक्षात घेऊन त्याला बेतिया GMCH रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुलाच्या चेहऱ्यावर आणि तोंडावर सूज आहे, मात्र सध्या त्याची तब्येत स्थिर आहे आणि त्याच्यावर लक्ष ठेवले जात आहे. हे अशक्य वाटतं! मुलाने विषारी सापाला दातांनी चावून मारणे ही गोष्ट वैद्यकीय दृष्टिकोनातूनही अचंबित करणारी आहेत. तो अत्यंत नशिबवान ठरला. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे तो आता धोक्याबाहेर आहे.’’

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment