ऑटो चालवणाऱ्या या महिलेला थेट राष्ट्रपती भवनातून फोन! चहापानाचं खास आमंत्रण, कारण ऐकून डोळे पाणावतील!

WhatsApp Group

Coimbatore Woman Auto Driver : संघर्ष, कष्ट आणि जिद्दीची खरी कहाणी म्हणजे कोयंबतूरमधील ऑटोचालक महिला संगीता. रोज प्रवाशांना ने-आण करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या सामान्य महिलेला आता थेट राष्ट्रपती भवनातून आमंत्रण मिळालं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानिमित्त राष्ट्रपती भवनात होणाऱ्या राष्ट्रपतींच्या चहापान कार्यक्रमासाठी तिला विशेष पाहुणी म्हणून बोलावण्यात आलं आहे.

संगीता गेल्या सहा वर्षांपासून कोयंबतूरच्या गौंडमपलायम परिसरात ऑटो चालवत आहे. तिचे पती बाळाजी हे बांधकाम मजूर म्हणून काम करतात. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. एक महाविद्यालयात शिक्षण घेत आहे, तर दुसरा शाळेत शिकतो.

भाड्याच्या घरात 20 वर्षांचा संघर्ष

संगीता आणि तिचे कुटुंब गेल्या 20 वर्षांपासून भाड्याच्या घरात राहत आहे. महिन्याला केवळ 15 हजार रुपयांच्या उत्पन्नात घरखर्च, भाडं आणि मुलांचं शिक्षण सांभाळणं हे मोठं आव्हान होतं. तरीही, “मुलांचं शिक्षण थांबू नये” हा निर्धार तिने कधीही सोडला नाही.

सरकारच्या योजनेमुळे स्वप्नाला आकार

घर मिळावं या आशेने संगीतानं ‘हाउसिंग फॉर ऑल’ (Housing for All) योजनेअंतर्गत तमिळनाडू अर्बन हॅबिटॅट डेव्हलपमेंट बोर्डकडे अर्ज केला. तिच्या कष्टांची दखल घेत तिला 2.10 लाख रुपयांचं अनुदान मंजूर झालं.

यासोबतच, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेऊन तिने प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी आधारित बांधकाम (PMAY-BLC) अंतर्गत स्वतःचं घर उभारलं.

राष्ट्रपती भवनात सन्मान

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण योजनेची लाभार्थी म्हणून, तसेच तिच्या अद्वितीय जिद्द आणि संघर्षाची दखल घेत, संगीतालाच थेट राष्ट्रपती भवनातील प्रजासत्ताक दिन कार्यक्रम आणि राष्ट्रपतींच्या चहापानासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे.

हा सन्मान स्वीकारताना संगीता भावूक झाली. “हा सन्मान मला अभिमान आणि आत्मविश्वास देणारा आहे. संकटं कितीही मोठी असली तरी महिलांनी मेहनत सोडू नये,” असं आवाहन तिनं केलं. तसंच, तिनं भारताच्या राष्ट्रपतींचे मनापासून आभार मानले.

ऑटो चालवणारी एक सामान्य महिला, भाड्याच्या घरातून राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचते, ही केवळ एक बातमी नाही, तर लाखो महिलांसाठी प्रेरणादायी यशोगाथा आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment