

Father Risks Daughters Life For Instagram Reel : राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील रूदावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वडिलांनी सोशल मीडियावर रील बनवण्याच्या नादात स्वतःच्या निरागस चिमुकलीचा जीव धोक्यात घातल्याची घटना उघडकीस आली आहे.
ही घटना बांध बारैठा परिसरात घडली. ४ जुलै रोजी उमा शंकर नावाचा व्यक्ती आपल्या पत्नी आणि लहान मुलीसह फिरायला गेला होता. फिरताना रील बनवण्याच्या हौसेपोटी त्याने स्वतःच्या मुलीला थेट पाण्याच्या वर असलेल्या लोखंडी एंगलवर उभं केलं, जे कोणत्याही क्षणी अपघातास कारणीभूत ठरू शकत होतं.
व्हिडिओ व्हायरल, इंस्टाग्रामवरून डिलीट
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. भारी पावसामुळे बांधात भरपूर पाणी आणि खोल दरी असल्याने, हे कृत्य अतिशय बेजबाबदार आणि धोकादायक असल्याचं स्पष्ट झालं.
विवाद वाढू लागल्यानंतर, उमा शंकरने आपला इंस्टाग्राम व्हिडिओ डिलीट केला आहे. मात्र तोपर्यंत व्हिडिओ अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर झाला होता.
ये रील का चक्कर है बाबू भईया!
— Surabhi🇮🇳 (@surabhi_tiwari_) July 7, 2025
राजस्थान के भरतपुर में माता-पिता रील के चक्कर में बेटी की जान को खतरे में डाला।#Rajasthan #BarethaDam #Bharatpur pic.twitter.com/8jTwTrVfT5
हेही वाचा – इंस्टाग्रामवर बुकिंग, घरात धुडगूस! ‘जेंडर रिव्हील’चं कारण देऊन केली ‘Project X’ पार्टीव
पोलीस तपास सुरू, सुरक्षा वाढवली
सध्या या घटनेबाबत पोलिसांनी अधिकृत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली असून, चौकशी सुरू आहे.
स्थानिक लोकांच्या तक्रारीनंतर, बांध परिसरात २ पोलीस कर्मचाऱ्यांची तैनाती करण्यात आली आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.
पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांची ओळख पटवण्याचे काम सुरू केले आहे, आणि लवकरच कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
पालकांनी जबाबदारीने वागण्याची गरज
हा प्रकार केवळ पालकत्वाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी चिमुकल्यांच्या जीवाशी खेळणं अत्यंत धोकादायक आणि निषेधार्ह आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!