Himachal Man Memory Return : हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील नाडी गावातील रिकी राम या युवकाचे आयुष्य 16व्या वर्षी एका भीषण अपघाताने पूर्णतः बदलले. 1980 साली अंबाला जवळील एका अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्या क्षणापासून त्याची संपूर्ण स्मृती पुसून गेली, त्याला स्वतःचे नाव, कुटुंब, मूळ गाव, काहीच आठवत नव्हते. या घटनेनंतर रिकी राम अचानक गायब झाला. दूरध्वनी, इंटरनेट नसलेला तो काळ, कुटुंबीयांनी अनेक वर्षे शोध घेतला, पण त्याचा काहीच मागोवा लागला नाही. त्याचे आई-वडील त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत मुलाबद्दलची परिस्थिती जाणून घेऊ शकले नाहीत.
‘रवी चौधरी’ म्हणून नवीन ओळख
स्मृती हरवल्यानंतर काही मित्रांनी त्याला ‘रवी चौधरी’ हे नाव दिले. त्याने मुंबईकडे स्थलांतर केले, अनेक छोटेमोठे कामे केली आणि नंतर महाराष्ट्रातील नांदेड येथे स्थायिक झाला. एका महाविद्यालयात नोकरी मिळाली, पत्नी संतोषीशी विवाह केला आणि दोन मुली आणि एक मुलगा असे कुटुंब उभे केले. त्याला त्या काळात आपल्या हिमाचलमधील कुटुंबाबद्दल काहीच माहिती नव्हती.
हेही वाचा – ताम्हिणी घाटात भीषण अपघात, पुण्यातील सहा तरुणांचा मृत्यू; 500 फूट दरीत कोसळली थार!
दुसऱ्या अपघातानंतर..
काही महिन्यांपूर्वी पुन्हा झालेल्या डोक्याच्या दुखापतीनंतर, अचानक आंब्याचे झाड, गावातील अरुंद वाटा, सतौन गावातील घराचे अंगण अशा स्पष्ट आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहू लागल्या. त्या आठवणी वास्तव असल्याची जाणीव झाल्यानंतर एका विद्यार्थ्याच्या मदतीने त्याने Google वरून नाडी आणि सतौन गाव शोधले. सतौन येथील एका कॅफेचा संपर्क क्रमांक मिळाला आणि तिथे संपर्क साधल्यानंतर त्याची माहिती कुटुंबातील नातेवाईक MK चौबे यांच्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर तुटलेले धागे पुन्हा जोडले गेले.
15 नोव्हेंबर — डोळे पाणावणारा क्षण
15 त्याचे भाऊ-बहीण त्याला मिठी मारून अश्रूंनी स्वागत करत होते. संपूर्ण गावाने 45 वर्षांचा हरवलेला मुलगा परत मिळाल्याचा अविस्मरणीय क्षण पाहिला.
वैद्यकीय मत
डॉक्टरांच्या मते, 45 वर्षांनी स्मृती परत येणे अत्यंत दुर्मिळ घटना आहे, परंतु मेंदूच्या तपशीलवार वैद्यकीय परीक्षणाद्वारे यासंबंधी अधिक स्पष्टता मिळू शकते.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!