छातीत तीव्र वेदना… तरीही 8 तास ‘वेटिंग’! भारतीय व्यक्तीचा कॅनडात मृत्यू, कुटुंब उद्ध्वस्त

WhatsApp Group

Indian Man Dies Canada Hospital : कॅनडातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फक्त 44 वर्षांचे भारतीय वंशाचे प्रशांत श्रीकुमार यांचा संशयित हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, छातीत तीव्र वेदना होत असतानाही रुग्णालयात तब्बल आठ तास उपचार न मिळाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

ही घटना एडमंटन (कॅनडा) येथील Grey Nuns Community Hospital मध्ये 22 डिसेंबर रोजी घडली. कामावर असताना अचानक छातीत जाळल्यासारखा आणि तीव्र वेदनांचा त्रास सुरू झाल्याने सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्यांचे नाव ट्रायेजमध्ये नोंदवण्यात आले आणि तेथून त्यांना वेटिंग एरियात बसवण्यात आले. त्यांचा वेदनेचा त्रास वाढत गेला. प्रशांत यांचे वडील कुमार श्रीकुमारही रुग्णालयात पोहोचले आणि मुलाने सांगितले, “पप्पा, मला खूप वेदना आहेत… सहन होत नाही.”

कुटुंबीयांच्या मते, त्यांनी डॉक्टरांना वारंवार सांगितले की वेदना सहनशक्तीबाहेर आहेत. ECG चाचणी केल्यानंतरही “काही गंभीर नाही” असे सांगत त्यांना वेटिंगमध्ये ठेवण्यात आले. दरम्यान ब्लड प्रेशर सतत वाढत राहिले आणि केवळ वेदनाशामक औषध दिल्याचे सांगितले जाते.

तब्बल आठ तासांनंतरच त्यांना उपचार विभागात बोलावण्यात आले. पण तिथे पोहोचताच काही सेकंदांतच प्रशांत अचानक कोसळले. नर्सेसनी जोरदार प्रयत्न करूनही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. त्यामुळे पत्नी आणि तीन लहान मुलं (वय 3, 10 आणि 14) कायमची पोरकी झाली.

ही घटना समोर आल्यानंतर कॅनडातील आपत्कालीन आरोग्यसेवेच्या गतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. रुग्णालय चालवणाऱ्या Covenant Health संस्थेने घटनेवर विशिष्ट प्रतिक्रिया न देत, प्रकरण Chief Medical Examiner कार्यालयाकडे तपासासाठी पाठवले असल्याचे सांगितले.

कुटुंबीय आता न्यायासाठी आवाज उठवत आहेत. “आठ तास वाट पाहावी लागली नसती तर आज माझा मुलगा जिवंत असता,” अशी वेदनादायी भावना वडिलांनी व्यक्त केली.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment