इटलीच्या पंतप्रधानांचे अश्लील फोटो व्हायरल! पॉ@र्न वेबसाईटवर भयंकर प्रकार, सरकारचा आक्रोश

WhatsApp Group

Giorgia Meloni Deepfake : इंटरनेटचा उपयोग योग्य पद्धतीने केला गेला, तर तो समाजासाठी वरदान ठरतो. मात्र अलीकडील काळात याच इंटरनेटचा गैरवापर करून महिलांच्या प्रतिष्ठेवर घाला घालणाऱ्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अशाच एका धक्कादायक घटनेने सध्या इटली हादरून गेला आहे.

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासह अनेक महिला नेत्यांच्या एडिट केलेल्या अश्लील फोटोना पॉर्न वेबसाइटवर व्हायरल करण्यात आलं आहे. या कृत्यामुळे संपूर्ण युरोपमध्ये संतापाचं वातावरण आहे.

सार्वजनिक फोटोचा गैरवापर

या फोटोसाठी “Phica” नावाच्या वेबसाईटचा वापर करण्यात आला आहे, ज्यावर सुमारे 7 लाखांहून अधिक सदस्य आहेत. हे फोटो सोशल मीडिया, सार्वजनिक कार्यक्रम, टीव्ही मुलाखती अथवा बीचवरील वैयक्तिक सुट्ट्यांमधून घेतले गेले होते. त्यानंतर त्यांना अश्लील स्वरूपात झूम इन करून त्या वेबसाईटच्या ‘VIP सेक्शन’मध्ये अपलोड करण्यात आलं.

हेही वाचा – गणपतीच्या सोंडेची दिशा तुमचं भविष्य ठरवते? वाचा घरात मूर्ती ठेवण्याचे खरे नियम!

पंतप्रधानांपासून सामान्य महिलांपर्यंत सगळ्याचं शिकार

या घटनेत पंतप्रधान मेलोनी, त्यांची बहीण आरियाना, प्रसिद्ध दिग्दर्शिका पाओला कोर्टेल्लेसी, नेत्या वलेरिया कैंपगना, अलेसिया मोरानी, अलेसैंड्रा मोरेट्टी आणि लिया क्वार्टरपेल्ले यांचंही नाव आहे. सर्वांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, कठोर कारवाईची मागणी केली आहे. अलेसिया मोरानी यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना लिहिलं,
हे अस्वीकार्य आणि अश्लील आहे. एका महिलेच्या नात्याने माझ्या अस्मितेला ठेच पोहचवली आहे. हे थांबवायलाच हवं!

‘Phica’ म्हणजे काय?

“Phica” हा इटलीमध्ये स्त्री शरीराच्या एका खासगी भागासाठी वापरला जाणारा असभ्य शब्द आहे. या वेबसाईटने महिलांना वस्तूप्रमाणे दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. ही वेबसाईट 2005 पासून वादग्रस्त राहिली असून, याआधीही तिच्यावर महिला विरोधी कंटेंटबाबत प्रश्न उपस्थित झाले होते.

कायदा कठोर, पण अंमलबजावणी?

इटलीमध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांविषयी कायद्यात सुधारणा करताना महिला-हत्या, स्टॉकिंग, रिवेंज पोर्न, आणि लैंगिक हिंसाचारासाठी कठोर शिक्षा ठरवण्यात आल्या आहेत. पण या घटनेमुळे हे दिसून येतं की, डिजिटल सुरक्षिततेबाबत अजूनही देश असुरक्षितच आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment