पाकिस्तानचा घोर प्रकार! श्रीलंकेतील पुरग्रस्तांना ‘मदती’च्या नावाखाली पाठवले एक्सपायरी फूड पॅकेट्स; सोशल मीडियावर संतापाची लाट

WhatsApp Group

Pakistan Expired Food Scam : श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली असून हजारो कुटुंबे पुरग्रस्त झाली आहेत. भारतासह अनेक देशांनी तत्काळ मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु, पाकिस्तानने ‘मदत’ या शब्दाला अक्षरशः लाजवेल असा प्रकार केला आहे. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी श्रीलंकेला मदतीसाठी पाठवलेली फूड पॅकेजेस एक्सपायर, सडकी आणि वापरण्यास अयोग्य असल्याचे उघड झाले. त्यामुळे श्रीलंकेतील नागरिकांनी आणि संपूर्ण सोशल मीडियाने पाकिस्तानवर संतापाचा वर्षाव केला आहे.

भारताचे मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असताना पाकिस्तानने ‘मोठेपणा’ दाखवण्यासाठी घाईघाईत फूड पॅकेट्स श्रीलंकेत पाठवले. याचे फोटो श्रीलंकेतल्या पाकिस्तानी दूतावासाच्या एक्स हँडलवरून शेअरही करण्यात आले. पण काही तासांतच लोकांनी फोटो झूम करून पाहिले आणि मोठा प्रकार समोर आला.

हेही वाचा – AQI 400 पार गेल्यावर तुमच्या फुफ्फुसांच्या आत काय घडतं?

फूड पॅकेट्सवरील एक्सपायरी डेट 2024

याचा अर्थ, ‘मदत’ देण्याच्या नावाखाली पाकिस्तान पुरग्रस्तांच्या जीवाशी खेळ करत होता. आधीच आपत्तीने त्रस्त असलेल्या श्रीलंकन नागरिकांसाठी पाकिस्तानने नवी संकट निर्माण केले. या प्रकारानंतर सोशल मीडियावर #ShameOnPakistan, #ExpiredAid अशी हॅशटॅग मोहीम सुरू झाली असून पाकिस्तानचा सार्वत्रिक निषेध होत आहे.

 तुर्कीसोबतही असाच प्रकार

फक्त श्रीलंकेच नाही, तर 2023 मध्ये तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपानंतरही पाकिस्तानने अशीच दगाबाजी केली होती.
त्यावेळी भारताने मोठ्या प्रमाणात मदत पाठवली होती, तर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ स्वतः फूड पॅकेट्ससह तुर्कीत पोहोचले होते. 

तुर्कीने पाकिस्तानला पूर्वी पाठवलेली सामग्रीच पाकिस्तानने पुन्हा तुर्कीलाच परत दिली होती! तेही नवीन म्हणून ‘चिपकवून’ पाठवण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर पाकिस्तानची जागतिक स्तरावर चांगलीच फजीती झाली होती.

पाकिस्तानची अशी दुटप्पी मदत आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय बनली आहे. श्रीलंकन नागरिकांमध्ये आक्रोश आहे की, “दुश्मन हजार मिळतील… पण मित्र भिकारी नको!” या म्हणीची प्रचीती पाकिस्तानच्या वर्तनाने पुन्हा एकदा दिली आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment