PM Modi Israel Speech : भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यादरम्यान एक नाट्यमय घडामोड समोर आली. बुधवार, 25 फेब्रुवारी रोजी ते इस्रायलच्या संसदेत भाषण करणार होते. मात्र त्यांच्या संबोधनापूर्वीच विरोधी पक्षातील खासदारांनी सभागृहातून वॉकआउट केले.
महत्त्वाचे म्हणजे हा निषेध पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात नव्हता. हा वॉकआउट इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि नेसेटचे सभापती आमिर ओहाना यांच्या निर्णयाविरोधात होता.
Something rare happened beyond big round of applause and standing ovation for Indian Prime Minister Sri Narendra Modi at the Israeli Parliament – The Knesset.
— Abhijeet Sinha (@Abhijeet_Sinhaa) February 25, 2026
Is that Israel Opposition decides to listen Indian PM Modi speech over internal political issues with Netanyahu. Gesture… pic.twitter.com/xPnv4FAi6s
वॉकआउटमागील नेमके कारण काय?
इस्रायलची संसद नेसेट येथे पंतप्रधान मोदींसाठी विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. विरोधकांचा आरोप असा होता की, सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायमूर्ती यित्झाक अमित यांना या विशेष अधिवेशनासाठी निमंत्रित करण्यात आले नव्हते.
विरोधी पक्षाने याला “संवैधानिक परंपरेचा अवमान” असे संबोधले. त्यांनी प्रथम नेतन्याहू यांच्या भाषणावर बहिष्कार टाकला आणि त्यानंतर मोदी यांच्या भाषणापूर्वी सभागृह सोडले.
मोदींच्या सन्मानासाठी पुन्हा उपस्थिती
वॉकआउटनंतर विरोधी पक्षांनी स्पष्ट केले की त्यांचा निषेध हा भारतीय पंतप्रधानांविरोधात नाही. Yesh Atid आणि Yisrael Beytenu या पक्षांनी संयुक्त निवेदनात म्हटले की, “आम्ही सभागृहात परत येऊ, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायलचे खरे मित्र आहेत.”
नेतन्याहू यांचे भाषण संपल्यानंतर विरोधी नेते यायर लॅपिड सभागृहात परतले. त्यांनी मोदी यांच्याशी हस्तांदोलन करत स्पष्ट केले, “आमचा वॉकआउट तुमच्याविरोधात नव्हता.” लॅपिड यांनी पुढे मोदी यांच्या नेतृत्वाचे आणि भारत-इस्रायल मैत्रीचे विशेष कौतुक केले.
सरकार आणि न्यायपालिकेतील तणाव
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, इस्रायलमध्ये काही काळापासून सरकार आणि न्यायपालिका यांच्यात तणावाचे वातावरण आहे. सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख म्हणून यित्झाक अमित यांच्या नियुक्तीबाबतही वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना निमंत्रण न दिल्याने विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.
भारत-इस्रायल संबंध अधिक दृढ
या घडामोडींनंतरही भारत आणि इस्रायल यांच्यातील संबंध अधिक दृढ असल्याचे चित्र स्पष्ट झाले. विरोधकांनीही मोदी यांच्या नेतृत्वाचे आणि इस्रायलप्रती असलेल्या पाठिंब्याचे कौतुक केले.
ही घटना इस्रायलच्या अंतर्गत राजकारणातील तणाव दाखवते, मात्र भारत-इस्रायल मैत्रीवर त्याचा परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा