Viral Ravi Sharma : दर महिन्याला 100 कोटी रुपयांहून अधिक टर्नओव्हर, 6 लाख रुपयांचा जीएसटी आणि महागड्या गाड्यांचा ताफा – हे सगळं ऐकून तुम्हालाही वाटेल की हा कुठला उद्योगपती किंवा बिझनेस आयकॉन असेल. पण नाही! सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेला ‘रवी शर्मा’ नावाचा व्यक्ती हे दावे करतो आणि त्याच्या व्हिडिओंनी सगळ्यांना चकित केलं आहे.
रवी शर्मा म्हणतो, “माझा महिन्याचा टर्नओव्हर 100 कोटींहून अधिक आहे. महिन्याच्या शेवटी माझा ‘बिझनेस क्लोज’ होतो. सकाळी मी ‘स्टार पर्ल’ असतो, 10 वाजता ‘एमरल्ड’, दुपारी ‘रुबी’, संध्याकाळी ‘स्टार रुबी’ आणि रात्रीपर्यंत ‘सफायर’ बनतो. दुसऱ्या दिवशी मी ‘स्टार सफायर’ होतो. हा माझ्या फक्त एका-दोन दिवसांचा बिझनेस आहे!”
इतक्यावरच नाही, तो आणखी म्हणतो, “मी महिन्याला ६ लाख रुपये जीएसटी भरतो साहेब! इनकम वेगळी आहे.” पण प्रश्न असा – एवढं श्रीमंतीचं प्रदर्शन करणाऱ्या या माणसाविषयी आजवर कोणत्याही मासिकात बातमी का आली नाही? कोणतीही एजन्सी याची चौकशी का करत नाही?
#DNAWithRahulSinha : सपनों का सौदागर या मार्केटिंग का 'महाठग' ?
— Zee News (@ZeeNews) October 14, 2025
मल्टी लेवल मार्केटिंग के जुड़े रवि शर्मा का दावा, महीने में 100 करोड़ की कमाई का दावा, 6 लाख GST भरने का दावा किया #DNA #ViralRaviSharma #ViralVideo #NetworkMarketing | @RahulSinhaTV pic.twitter.com/l2H79vWGMZ
उत्तर आहे – कारण रवी शर्मा हा मल्टी लेव्हल मार्केटिंग (MLM) म्हणजेच नेटवर्क मार्केटिंगशी संबंधित आहे.
हेही वाचा – गुजरातचं असं गाव जिथं बँकेत आहेत तब्बल ₹1000 कोटी! प्रत्येक घरात परदेशी कमावता, पण गावात स्वच्छतेचा आदर्श!
🚨 अब रवि शर्मा की पोल देश के आगे खुल चुकी है।।
— MOHD_SAMEER_ 🇮🇳 (@IMDSameerIND) October 16, 2025
Ravi Sharma Scam Exposed 2025 pic.twitter.com/mgpQ738JUH
‘नेटवर्क मार्केटिंग’चा खेळ
रवी शर्मा ज्या मंचावर उभा राहून हे दावे करत होता, तो एक MLM कंपनीचा सेमिनार होतं. या व्यवसायात वस्तू विकण्यासोबत इतर लोकांना सदस्य बनवण्यावर भर दिला जातो. जेवढे मेंबर तयार कराल, तेवढं कमीशन वाढतं.
शोरूम से घर तक सफर पूरा हुआ है लोगो को मज़ाक लगता है Ravi Sharma | #royalrcmofficial pic.twitter.com/oPTWDep6cP
— ROYAL RCM OFFICAL (@ROYALRCMOFFICIA) October 16, 2025
काय आहे हा प्रकार?
देशात सुमारे 5 हजार मल्टी लेव्हल मार्केटिंग कंपन्या सक्रिय आहेत. 2011-12 मध्ये या क्षेत्राचा टर्नओव्हर 6385 कोटी होता. 2023 पर्यंत तो 21282 कोटींवर गेला. अंदाजानुसार 2025 मध्ये हा आकडा 64500 कोटींवर पोहोचेल.
कसा होतो या कंपन्यांमधून फसवणुकीचा खेळ?
या कंपन्या उत्पादन विकण्यापेक्षा नवे मेंबर बनवण्यावर लक्ष केंद्रित करतात. मेंबर वाढवून ‘कमीशन’ मिळवले जाते, पण नवीन लोकांना फारच कमी रक्कम मिळते. Indian Direct Selling Association च्या अहवालानुसार, वैध डायरेक्ट सेलिंगमधील फक्त 10% एजंट नफा कमावतात, तर उर्वरित 90% लोकांना तोटा होतो. MLM मध्ये तर फसवणुकीचं प्रमाण याहूनही जास्त आहे.
देशभरात 88 लाख लोक अशा स्कीममध्ये अडकले आहेत.
- PACL (पर्ल अॅग्रो) – 6 कोटी गुंतवणूकदारांचे ₹49100 कोटी बुडाले
- शारदा चिटफंड – 30 लाख गुंतवणूकदारांचे ₹25000 कोटी बुडाले
- स्पीक एशिया – 24 लाख लोकांचे ₹2200 कोटी गेले
एकूण पाहता, MLM कंपन्यांनी साधारण 2 लाख कोटी रुपयांची ठगी केली आहे.
खरे श्रीमंत कधी बोलून दाखवत नाहीत..
टाटा, महिंद्रा, बिर्ला किंवा एलन मस्क यांच्यासारखे खरे उद्योगपती कधी आपल्या संपत्तीचा गाजावाजा करत नाहीत. ते त्यांच्या कामातून, नवनवीन कल्पकतेतून आणि प्रामाणिकपणातून ओळखले जातात. म्हणूनच, जर कोणी तुम्हाला “लवकर श्रीमंत बनण्याचा मार्ग” सांगत असेल, तर एकच करा, सावधान राहा!
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा