

Wife Charges Husband For Lunch : अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेनं सोशल मीडियावर खळबळ उडवणारी माहिती शेअर केली आहे. ती दररोज आपल्या पतीसाठी लंच बनवते आणि त्याबदल्यात 10 पाउंड म्हणजे सुमारे ₹1160 रुपये शुल्क घेते! टिकटॉकवर या महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यानंतर नेटिझन्समध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे – घरातली कामं फक्त प्रेमासाठी की त्यांची किंमतही असावी?
“बाहेर McDonald’s ला पैसे खर्च करतो, मग मलाही द्यायला हवेत!”
या महिलेचं म्हणणं आहे, “जर माझा नवरा रोज बाहेर 10 पाउंड लंचसाठी खर्च करू शकतो, तर तीच रक्कम मी त्याच्यासाठी घरातच टेस्टी आणि हेल्दी लंच बनवते म्हणून मला का नाही मिळू शकत?” ती म्हणते, की जेवण बनवताना तिच्या मेहनतीबरोबरच वेळ, कल्पकता आणि क्रिएटिविटी लागते. त्यामुळे त्या कामाचं मोल मिळणं गरजेचं आहे. “ज्याच्यावर तू प्रेम करतोस, तिला तिच्या मेहनतीसाठी पैसे द्यावेत,” असं ती स्पष्टपणे सांगते.
हेही वाचा – Bank Holidays August 2025 : रक्षाबंधन ते गणेश चतुर्थी…15 दिवस बँका बंद!
घरकामाचं मोल – प्रेम की पेमेंट?
या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटत आहेत. टीका करणारे म्हणतात, “घरात जेवण बनवण्यावर पैसे घेणं म्हणजे नवऱ्यासोबतच्या नात्याला बिझनेस डीलसारखं करणं!” समर्थक म्हणतात, “ही स्मार्ट मूव्ह आहे, महिलांचं घरातलं ‘अनपेड लेबर’ आता मान्यता मिळाली पाहिजे!” एक महिला यूजर म्हणाली, “आता मी देखील माझ्या नवऱ्याकडून लंच बनवण्याचे पैसे घेणार!”
पतीही खूश आहे?
या डीलबद्दल तिच्या पतीला काहीही त्रास नाही. तो वेळेवर लंच मिळतो आणि तिला वेळेवर पेमेंट देखील देतो. मात्र, ही महिला कबूल करते की रोज काहीतरी नवीन आणि टेस्टी बनवणं सोपं नाही, “ही सुद्धा एक टफ जॉब आहे,” असं तिचं मत आहे.
चर्चेचा विषय – पत्नीने लंचसाठी पैसे घ्यावेत का?
ही चर्चा आता एका मोठ्या सामाजिक मुद्द्याकडे लक्ष वेधते – घरातल्या महिलांचं काम फक्त कर्तव्य आहे की त्याची किंमतही असावी? तुमचं मत काय? तुम्हाला वाटतं का की पत्नीने पतीकडून लंचसाठी दररोज पैसे घ्यावे?
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!