Viral Video : स्टेजवर अभिनेत्रीला स्पर्श करताना पवन सिंह कॅमेऱ्यात कैद; सोशल मीडियावर भयंकर ट्रोल!

WhatsApp Group

Pawan Singh Touches Heroine On Stage Viral Video : भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पवन सिंह पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून, त्यामध्ये तो स्टेजवर आपल्या को-स्टार अंजली राघवच्या कंबरेला स्पर्श करताना दिसतो.

कंबरेला हात लावताना

या कार्यक्रमात अंजली स्टेजवर काही बोलत असताना, बाजूलाच उभा असलेला पवन सिंह अचानक तिच्या कंबरेला हात लावताना दिसतो. त्यानंतर तो म्हणतो, “ये क्या लगा है… ज़रा हाथ हटाओ।” त्यावर अंजली ओशाळलेल्या चेहऱ्याने, “नाही नाही, अरे हटवा ना,” असं हसत हसत म्हणते. मात्र तिच्या चेहऱ्यावरचा अस्वस्थपणा लपलेला नसतो.

वागणुकीवर संताप

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या असून, अनेकांनी पवन सिंहच्या वागणुकीवर संताप व्यक्त केला आहे. “हे अतिशय चीप आहे”, “हीरोइन क्लिअरली अनकंफर्टेबल होती”, “स्टार्सनी असं वागणं शोभत नाही” अशा अनेक टिप्पण्या सोशल मीडियावर वाचायला मिळत आहेत.

हेही वाचा – टी-20 वर्ल्डकप खेळलेल्या क्रिकेटरने केली चोरी, कोर्टात गुन्ह्याची कबुली, मोठे रेकॉर्ड नावावर!

माफी मागण्याची मागणी

पवन सिंहला लोकांनी जबरदस्त ट्रोल केलं असून, काही युजर्सनी त्याला पब्लिकली माफी मागण्याची मागणी केली आहे. एवढंच नव्हे तर काहींनी त्याच्या विरोधात मोहीमही सुरू केली आहे.

या घटनेवर अजून पवन सिंह किंवा अंजली राघव यांच्याकडून कोणतंही अधिकृत विधान आलेलं नाही. मात्र हे प्रकरण सध्या एक्स (पूर्वीचा ट्विटर) आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर चांगलंच चर्चेत आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment