T20 World Cup Player Robbery : टी-20 वर्ल्डकपमध्ये दोनदा खेळलेला आणि वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर असलेला पापुआ न्यू गिनी संघाचा क्रिकेटपटू किपलिंग डोरिगा (Kiplin Doriga) सध्या गंभीर अडचणीत सापडला आहे. डोरिगावर डकैतीचा गंभीर आरोप करण्यात आला असून त्याने न्यायालयात स्वतःचा गुन्हाही कबूल केला आहे.
किपलिंग डोरिगा हा एक यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2017 मध्ये पदार्पण केलं होतं. पण आता त्याच्यावर जर्सी शहरातील सेंट हेलियर्स येथे 25 ऑगस्ट रोजी घडलेल्या डकैती प्रकरणात आरोप लावण्यात आले आहेत. हे प्रकरण इतकं गंभीर आहे की न्यायालयाने याला थेट रॉयल कोर्टमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. डोरिगाला आता 28 नोव्हेंबर रोजी कोर्टात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वर्ल्ड रेकॉर्डधारक क्रिकेटपटू
किपलिंग डोरिगाने आपल्या कारकिर्दीत वानुआटूविरुद्ध खेळताना एका सामन्यात पाच झेल पकडून वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. आत्तापर्यंत त्याने पापुआ न्यू गिनीसाठी 39 वनडे खेळत 730 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. टी20मध्ये त्याने 43 सामन्यांत 359 धावा केल्या आहेत.
#PapuaNewGuinea cricketer jailed for robbery during international tournament in #Jersey
— THE WEEK (@TheWeekLive) August 29, 2025
Details: https://t.co/JW4eIzNcQM
हेही वाचा – पाहा : हरभजनने श्रीशांतच्या कानाखाली लगावल्याचा व्हिडीओ 18 वर्षांनी जगासमोर!
दोनदा टी20 वर्ल्डकपमध्ये सहभाग
डोरिगाने 2021 आणि 2024 साली ICC T20 World Cup मध्ये सहभाग घेतला होता. 2021 मध्ये त्याने 3 सामन्यांत 64 धावा केल्या, तर 2024 मध्ये 4 सामन्यांत 71 धावा केल्या. त्याचा शेवटचा टी20 सामना 14 ऑगस्ट 2025 रोजी झाला होता.
आता काय होणार?
एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू न्यायालयाच्या फेऱ्यात अडकतोय, हे क्रिकेट जगतात मोठं धक्का देणारं प्रकरण ठरतंय. डोरिगाचं क्रिकेट भविष्य आता अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकलेलं दिसतंय.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!