

War 2 Hrithik Roshan Jr NTR Dance : बॉलिवूडचे दिग्दर्शक-निर्माते आदित्य चोप्रा पुन्हा एकदा त्याच्या जुन्या पण प्रभावी मार्केटिंग स्ट्रॅटेजीकडे परतले आहेत. यावेळी त्यांचा फोकस आहे वर्षातील सर्वात बहुप्रतिक्षित अॅक्शन फिल्म ‘वॉर 2’ वर, ज्यात ऋतिक रोशन आणि Jr NTR पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत.
डान्स नंबर फक्त थिएटरमध्येच!
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, ‘वॉर 2’ मध्ये एक जबरदस्त डान्स नंबर आहे ज्यामध्ये ऋतिक आणि Jr NTR चा परफॉर्मन्स आहे. पण या गाण्याचं पूर्ण व्हर्जन प्रेक्षकांना केवळ सिनेमाघरातच पाहायला मिळणार आहे. प्रमोशनसाठी याचा एक छोटासा टीझर किंवा झलकच रिलीज केली जाईल, पूर्ण गाणं नाही.
THE DANCE STEPS OF JNR NTR 🔥👑
— Johns. (@CricCrazyJohns) August 7, 2025
– He is coming to rule…!!!! pic.twitter.com/IUbBvWcFHI
आदित्य चोप्राची जुनी यशस्वी ट्रिक पुन्हा वापरली!
या आधीही आदित्य चोप्रा अशाच प्रकारची रणनीती वापरत आला आहे. ‘बंटी और बबली’मधलं ‘कजरारे…’ आणि ‘धूम 3’मधलं ‘कमली…’ हे गाणं त्यांनी याच पद्धतीने फक्त थिएटरमध्ये दाखवून लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली होती – आणि हे फारच यशस्वी ठरलं होतं.
हेही वाचा – Viral Video : ‘बकरी मेली म्हणून’ थेट २५ कुत्र्यांना घातल्या गोळ्या! राजस्थानातील थरकाप उडवणारी घटना
‘वॉर 2’ चा धमाकेदार टीझर 7 ऑगस्टला
या बहुचर्चित डान्स सॉन्गचा टीझर 7 ऑगस्ट 2025 रोजी रिलीज होणार आहे. त्यामुळे यशराज फिल्म्सकडून जोरदार प्रमोशनल मोहिम सुरू होणार आहे, आणि प्रेक्षकांच्या उत्कंठेला अजून हवा मिळणार आहे.
ऋतिक vs Jr NTR – अॅक्शन आणि डान्सची टक्कर!
‘वॉर 2’ मध्ये फक्त अॅक्शन नव्हे तर डान्सचाही जबरदस्त डोस आहे. ऋतिकचा बिनधास्त डान्स तर आधीच प्रसिद्ध आहे, पण Jr NTR देखील त्याच्या साऊथ इंडियन फिल्ममधील परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. या दोघांची जोडी एका धमाकेदार गाण्यासाठी एकत्र आली आहे हेच प्रेक्षकांसाठी एक मोठं आकर्षण ठरणार आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!