AIनं बदलला ‘रांझणा’चा शेवट; ‘धनुष’ संतापला, म्हणाला “ही ती फिल्मच नाही!”

WhatsApp Group

Dhanush On Raanjhanaa AI Controversy  : 2013 मध्ये आलेली दिग्दर्शक आनंद एल राय यांची सुपरहिट फिल्म ‘रांझणा’ ही एकतर्फी प्रेमावर आधारित चित्रपटप्रेमींना भिडलेली कलाकृती होती. या चित्रपटात धनुषने साकारलेला ‘कुंदन’ लाखोंच्या हृदयात घर करून गेला होता. मात्र आता तब्बल 12 वर्षांनंतर जेव्हा ‘रांझणा’चा तमिळ रि-रिलीज वर्जन थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा प्रेक्षकांना एक धक्का बसला.

चित्रपटाचा क्लायमॅक्स बदलण्यात आला

या नव्या वर्जनमध्ये चित्रपटाचा क्लायमॅक्स AI (Artificial Intelligence) च्या साहाय्याने पूर्णपणे बदलण्यात आला आहे. मूळ चित्रपटात जिथे कुंदन हॉस्पिटलमध्ये शेवटी प्राण सोडतो, तिथे AI क्लायमॅक्समध्ये तो जिवंत राहतो! यामुळे चित्रपटाचा मूळ गाभाच नष्ट झाला असल्याचं धनुषने अधिकृतपणे जाहीर केलं आहे.

धनुष म्हणतो..

धनुषने त्याच्या X (पूर्वीचा ट्विटर) अकाउंटवर एक स्टेटमेंट शेअर केलं असून, त्यामध्ये तो म्हणतो, “रांझणा चा AI क्लायमॅक्स मला पूर्णपणे विचलित करणारा आहे. हा बदल मूळ भावनांना मारक आहे. मी याला साफ विरोध केला होता, तरीही तो केला गेला. ही ती फिल्म नाही ज्याशी मी 12 वर्षांपूर्वी जोडलेलो होतो.”

हेही वाचा – तुमचं आधार कार्ड लिंक आहे का? मिळतील ‘हे’ १० फायदे, बहुतेकांना माहितच नाही!

धनुषने मागणी केली आहे की, AI चा वापर सर्जनशील कलाकृतींमध्ये करणे थांबवले पाहिजे. त्याच्या मते, अशी उदाहरणं पुढे होऊ नयेत म्हणून कडक नियमावली बनवणं आवश्यक आहे. “कथा आणि कलाकारांच्या भावना यांची पायमल्ली होऊ नये,” असं त्याचं ठाम मत आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणतात…

चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल राय यांनीही यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “माझ्या संमतीशिवाय आणि माहितीशिवाय चित्रपट पुन्हा रिलीज करणं, आणि त्यात बदल करणं, हे एखाद्या कलाकारासाठी पूर्णपणे तोडून टाकणारं असतं.” त्यांनी यास अत्यंत गंभीर आणि क्लेशदायक अनुभव म्हटले आहे.

या सगळ्या वादामुळे, ‘रांझणा’च्या चाहत्यांमध्येही संताप आहे. अनेकांनी सोशल मीडियावर AI चा विरोध करत, सर्जनशीलतेसाठी ‘मानवी भावना आणि कलात्मक निर्णयांची’ गरज असल्याचं नमूद केलं आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment