6 महिन्यांची खोटी ओळख! अभिनेत्रीने बनवली भारतीय कागदपत्रं, कोलकात्यातून अटक!

WhatsApp Group

Bangladeshi Actress Arrested In India : भारतात अवैधरित्या राहणाऱ्या एका बांगलादेशी अभिनेत्रीला कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीची ओळख बारीसाल, बांग्लादेश येथील शांता पॉल (वय 28) अशी झाली असून, तिच्याकडून दोन आधार कार्ड, एक मतदार ओळखपत्र आणि एक शिधापत्रिका (राशन कार्ड) जप्त करण्यात आली आहेत.

दोन पत्त्यांवर बनवलेले आधार कार्ड

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, शांता पॉल कोलकात्याच्या जादवपूर परिसरात भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये राहत होती. तिच्या अटकेदरम्यान, पोलिसांनी भारतीय व बांगलादेशी दोन्ही प्रकारची कागदपत्रं जप्त केली आहेत. बांगलादेशी पासपोर्ट, एज्युकेशन अॅडमिट कार्ड, तसेच भारतातले दोन आधार कार्ड (एक कोलकाता आणि दुसरं वर्तमान पत्ता असलेले), मतदार ओळखपत्र आणि राशन कार्ड या कागदपत्रांचा समावेश आहे.

हेही वाचा – इतिहासातील सर्वात लांब वीज! नवा जागतिक विक्रम, ‘मेगाफ्लॅश’ पाहून वैज्ञानिकही थक्क!

कोणतीही वैध कागदपत्रं नाहीत

कोलकाता पोलिसांच्या क्राईम विभागाचे संयुक्त सचिव रूपेश कुमार यांनी सांगितले की, “शिकायत मिळाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आणि त्यानंतर शांता पॉलला अटक केली. तिच्याकडे वैध व्हिसा नव्हता, तसेच तिने आधार व अन्य सरकारी दस्तऐवज कसे मिळवले याबाबत समाधानकारक उत्तर दिलं नाही.”

UIDAI, निवडणूक आयोगाकडे माहिती मागवली

कोलकाता पोलिसांनी यासंदर्भात UIDAI, निवडणूक आयोग आणि पश्चिम बंगालच्या अन्न विभागाशी संपर्क साधला आहे. इतक्या सहजपणे एका बांगलादेशी नागरिकाला आधार, व्होटर कार्ड, राशन कार्ड कसे मिळाले? याचा तपास सुरू आहे.

बांग्लादेशमधील लोकप्रिय चेहरा

शांता पॉल ही बांग्लादेशातील अभिनेत्री, टीव्ही अँकर आणि ब्युटी कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेणारी स्पर्धक होती. अनेक बांगलादेशी चॅनेल्सवर ती काम करत होती. 30 जुलै रोजी तिला स्थानिक कोर्टात हजर करण्यात आले असून, 8 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment